Nashik News: गिरणा-मोसमचा बेकायदेशीर वाळूउपसा थांबता थांबेना! महसूल-पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह

Nashik News : मालेगाव तालुक्यातील गिरणा व मोसम या दोन प्रमुख नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरुच आहे.
Bullock carts carrying sand seized from Tehsil office premises in Malegaon.
Bullock carts carrying sand seized from Tehsil office premises in Malegaon.esakal
Updated on

मालेगाव : तालुक्यातील गिरणा व मोसम या दोन प्रमुख नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरुच आहे. वाळू वाहून नेणारे चोरटे रस्ते तहसिलदारांनी जेसीबीच्या सहाय्याने खोदले तरी वाळूमाफियांनी पर्यायी रस्ते शोधून काढले आहेत. बैलगाडीतून वाळू वाहतुकीचा फंडा येथे राजरोसपणे सुरु आहे.

तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी वाळू वाहून नेणाऱ्या दोन बैलगाड्या जप्त केल्या. तालुक्यातील विविध नद्यांमधील वाळू उपसा थांबता थांबत नसल्याने महसूल व पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. (Nashik illegal sand extraction of girna mousam river marathi news)

गिरणा नदीपात्रातून चिंचावड, आघार, दाभाडी व सवंदगाव शिवारातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा केला जात आहे. तर मोसम नदीपात्रातून वळवाडी, वडनेर, अजंग, काष्टी आदी शिवारातून वाळू उपसा होत आहे. दोन महिन्यांपूर्वी तहसिलदारांनी वाळू वाहून नेणारे चोरटे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खोदले होते.

तसेच, वाळू उपशाला आळा घालण्यासाठी भरारी पथक नियुक्त करण्यात आले होते. यानंतर आठ-दहा दिवस या प्रकारांना आळा बसला. वाळू वाहतूक करणाऱ्यांनी पर्यायी रस्ता शोधून काढला आहे. ट्रॅक्टर व बैलगाडीतून वाळू वाहतूक केली जात आहे. ट्रॅक्टरमधून मध्यरात्रीनंतर वाळू वाहतूक होते. (Latest Marathi News)

Bullock carts carrying sand seized from Tehsil office premises in Malegaon.
Nashik Bike Theft: ‘स्मार्ट सिटी’तील दुचाकी वाहने असुरक्षितच! 2 महिन्यांत तब्बल 144 दुचाकींची चोरी

विहीरींतील साठा खालावला

मोसम व गिरणा या दोन्ही नदीपात्रांमध्ये वाळू वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या रात्री ट्रॅक्टरमधून, तर दिवसा बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते. गिरणा नदीपात्रातून दोन बैलगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. वाळू उपशामुळे नदीकाठच्या विहिरींमधील जलसाठा देखील कमी होत आहे. महसूल व पोलिस प्रशासनाने याबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

Bullock carts carrying sand seized from Tehsil office premises in Malegaon.
Nashik Water Crisis : धरण उशाला कोरड घशाला! कादवा नदीपात्र कोरडे पडल्याने जलचर प्राण्यांचा मूत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.