Nashik News : आयएमए नियोजित अध्यक्षपदासाठी शनिवारी (ता.१६) झालेल्या निवडणुकीतील अत्यंत चुरशीच्या लढतीत शल्यचिकित्सक डॉ. नीलेश निकम यांनी सर्वाधिक मते मिळवीत विजय प्राप्त केला. त्यामुळे ते आयएमए नाशिक शाखेचे २०२५-२६ चे अध्यक्षपद भूषविणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेत निवडणूक क्वचितच होते. (Nashik IMA appointed as President Victory of dr Nilesh Nikam marathi news)
यंदा नियोजित अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात असल्याने नियोजित कार्यक्रमानुसार शनिवारी निवडणूक झाली. त्यानुसार दुपारी बारा ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया झाली. साडे सहापासून मतमोजणीला सुरवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.
आयएमए नाशिक शाखेच्या सुमारे पंधराशे सदस्यांपैकी एक हजार ३१२ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये शल्यचिकित्सक डॉ. नीलेश निकम यांनी ६९८ मते मिळवत अटीतटीची लढत जिंकली. तर बालरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पाटील यांनी ६१२ मते मिळविली. (latest marathi news)
७६ मतांच्या अत्यंत कमी फरकाने त्यांचा पराभव झाला. दरम्यान कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या १८ जागांसाठी एकूण २७ डॉक्टर सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र नऊ जणांनी माघार घेतल्यामुळे सर्व अठरा जागांवर बिनविरोध निवड झाली.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, सचिव डॉ. माधवी गोरे-मुठाळ, उपाध्यक्षा डॉ. मनीषा जगताप, खजिनदार डॉ. पंकज भट, सहसचिव डॉ. प्रेरणा शिंदे, डॉ. सागर भालेराव आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. उमेदवार अधिकारी म्हणून डॉ. शिरिष देशपांडे, डॉ. राजश्री पाटील, डॉ. पंकज गुप्ता यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.