Nashik News : ‘वसाका’ची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवा; ‘वसाका बचाव कृती समिती’ पदाधिकाऱ्यांची मागणी

Nashik : मंत्रालय स्तरावर सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याची मागणी ‘वसाका बचाव कृती समिती’चे अध्यक्ष सुनील देवरे यांनी बुधवारी (ता. १७) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
Sunil Devere, Panditrao Nikam, Vijay Pagar etc. explaining their position in the press conference against the sale of 'Vasaka' on Wednesday.
Sunil Devere, Panditrao Nikam, Vijay Pagar etc. explaining their position in the press conference against the sale of 'Vasaka' on Wednesday.esakal
Updated on

Nashik News : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया त्वरित थांबविण्यात यावी व कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी अर्थात, मंत्रालय स्तरावर सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याची मागणी ‘वसाका बचाव कृती समिती’चे अध्यक्ष सुनील देवरे यांनी बुधवारी (ता. १७) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘मविप्र’चे संचालक विजय पगार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, कामगार युनियनचे अध्यक्ष विलास सोनवणे, अरुण सोनवणे, हिरामण बिरारी आदी उपस्थित होते. ( Immediately stop sale process of Vasaka demands of Rescue Action Committee office bearers )

‘वसाका’वर राज्य सहकारी बँकेचे व्याजासह १०४ कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. त्यामुळे या बँकेने १९ जून २०२४ ला ‘वसाका’ विक्रीची निविदा काढली असून, निविदेत १६२ कोटी ४४ लाख ७० हजार रुपये किंमत ठरविण्यात आली आहे. त्यात कामगार देणी, शेतकरी, व्यापारी देणी, कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड व इतर अशी सर्व देणी निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित खरेदीदाराने त्याच्या सोयीने देणे आहे. मात्र संबंधित कारखाना विक्रीचा प्रस्ताव ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगारांना अमान्य आहे.

कारण ४०० कोटींची मालमत्ता अशा प्रकारे कमी दरात विक्री करून सभासदांची फसवणूक होता कामा नये. उलट या कारखान्याची विक्री होऊ नये, यासाठी स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन शासनदरबारी बैठक बोलवावी. संबंधित विक्री प्रक्रिया बंद करून ‘वसाका’ पुन्हा भाडेतत्त्वावर देण्याबाबत फेरविचार केला जावा व योग्य पद्धतीने नवीन भाडेकराराची निविदा काढावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. (latest marathi news)

Sunil Devere, Panditrao Nikam, Vijay Pagar etc. explaining their position in the press conference against the sale of 'Vasaka' on Wednesday.
Nashik News : नारळ देणार कमी खर्चात जास्त उत्पन्न; कसमादेत बदलली शेती पद्धत

पंडितराव निकम म्हणाले, की कुठल्याही परिस्थितीत ‘वसाका’ची विक्री होऊ देणार नाही, जर अशा प्रकारे विक्री होऊन कोणी खरेदी केली, तर त्यांना अशा प्रकारे कारखाना चालविण्यास प्रतिबंध करू. माझ्या या भूमिकेबाबत स्थानिक सभासदांनी आपली मते स्पष्ट करावीत, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. विजय पगार यांनी सांगितले, की वसाका उभारणी कार्यात (कै.) ग्यानदेवदादा देवरे यांनी रक्ताचे पाणी करून कारखान्याची उभारणी केली. ‘कसमादे’चे हे वैभव टिकायला आणि चालायला हवे. त्याला विकणे हा पर्याय होऊ शकत नाही. विलास सोनवणे यांनीही ‘वसाका’ची विक्री होऊ नये, याचा पुनरुच्चार केला.

सभासदांनी कारखाना सहकार तत्त्वावर चालवावा

‘वसाका’ची विक्री होऊ न देता खरंतर तो सभासदांनी एकत्रित येत सहकार तत्त्वावर चालवला, तर अधिक उत्तम होईल. मात्र तसे न झाल्यास तो भाडेतत्त्वावर चालवला तरी चालेल. प्रमाणापेक्षा अधिक भाडेपट्ट्याची मागणी केली जात असल्याने त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने याबाबत सर्वंकष विचार होण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.

Sunil Devere, Panditrao Nikam, Vijay Pagar etc. explaining their position in the press conference against the sale of 'Vasaka' on Wednesday.
Nashik News : काम वाटपापूर्वी नोटीस बोर्डावर कामांची यादी प्रसिद्ध करावी; मजूर फेडरेशनची जि. प. प्रशासनाकडे मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.