Nashik Lok Sabha Election : राजकीय पदाधिकार्‍यांची पोलिसांकडून ‘कोंडी’; गुन्हेगारांसह राजकीय पदाधिकार्‍यांना तडीपारच्या नोटीसा

Lok Sabha Election : सराईत गुन्हेगारांसह राजकीय पक्षांच्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना २१ तारखेपर्यंत शहर-जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात येत असल्याच्या नोटीसा बजाविल्याचे समजते.
police
police esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदार संघासाठी येत्या सोमवारी (ता.२०) मतदान होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये व मतदान प्रक्रियेला गालबोट लागू नये, या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेकडून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह राजकीय पक्षांच्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना २१ तारखेपर्यंत शहर-जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात येत असल्याच्या नोटीसा बजाविल्याचे समजते. ( Impeachment notice to political officials including criminals by police )

दरम्यान, ठराविक राजकीय पक्षांच्याच पदाधिकारी-कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसा बजाविण्यात आल्याने सत्ताधारी पक्षांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याची चर्चा होते आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहर आयुक्तालय हद्दीत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्यांवर यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत सराईत गुन्हेगारांवर तडीपारी व स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे.

त्यानंतरही निवडणूक काळात, विशेषत: मतदान प्रक्रियेला गालबोट लागण्याच्या शक्यतेसह, मतदान प्रक्रियेवर प्रभाव पाडून अनुचित प्रकार घडवू शकतात, अशा काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी आपआपल्या हद्दीतील पोलिस ठाणे निहाय संबंधितांना २१ तारखेपर्यंत शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्याच्या नोटीसा बजाविल्या आहेत.

पोलिसांच्या या कारवाईमुळे ठराविक राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहे. आयुक्तालयातील तेराही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांसह काही राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या याद्या करण्यात आल्या आहेत. काही संशयित हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेत्यांच्या संपर्काती आहेत. तरी काही पदाधिकारीही आहेत.

police
Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रात कांदा, लिंबू अन् मोबाईल बंदी! निवडणूक आयोगाने घेतली धास्ती

यांच्यामुळे निवडणुकीत काही कारणास्तव मतदान केंद्र, मोकळे मैदान व विविध भागांत गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्यातून मतदान प्रक्रियेवर विपरित परिणाम होऊ शकतो, यामुळे पोलीसांनी संबंधितांना आगामी तीन दिवसांसाठी तडीपारीच्या नोटीसा बजाविल्याचे सांगण्यात येते.

पोलिस यंत्रणेचा वापर

आगामी तीन दिवसांसाठी शहरातील शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसा शहर पोलिसांकडून बजाविण्यात आल्याचे समजते. यातून सत्ताधारी राजकीय पक्षांकडून पोलीस यंत्रणेचा वापर होत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षात पदाधिकारी असलेले सराईत गुन्हेगारांविरोधात कोणतीही कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली नाही, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त होते आहे.

नोटिशीत तंबीही

दरम्यान, पोलिसांनी बजाविलेल्या नोटिशीत, संबंधितांना मंगळवारपर्यंत (ता.२१) जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात रितसर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, अशी तंबीही पोलिसांनी नोटिसांद्वारे दिली आहे. 

police
Nashik Lok Sabha Election : नाशिकमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे सामना! 'या' मुद्द्यांमुळे गोडसेंना निवडणूक जड जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.