Nashik Anganwadi News : अंगणवाड्यांत यंदापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

Nashik News : यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून पूर्वप्राथमिक स्तरावरही (अंगणवाडी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.
Implementation of National Education Policy will be started in Anganwadi
Implementation of National Education Policy will be started in Anganwadiesakal
Updated on

नामपूर : यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून पूर्वप्राथमिक स्तरावरही (अंगणवाडी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. या धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके राज्यातील १ लाख ३१ हजार अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. (Implementation of National Education Policy will be started in Anganwadi)

पूर्वप्राथमिक शिक्षणाचा समावेश औपचारिक शिक्षणामध्ये करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे अक्षरांची तोंडओळख, गाणी, गोष्टी, खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया चालत होती. मात्र, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकटच बदलण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वप्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झाला आहे.

पूर्वप्राथमिक शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान महत्त्वाचे मानण्यात आले आहे. या अनुषंगाने धोरणात प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) पूर्वप्राथमिक किंवा पायाभूत स्तरासाठीचा अभ्यासक्रम आराखडा तयार केला. या आराखड्यानुसार राज्यस्तरासाठीच्या अभ्यासक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) निर्मिती केली आहे.

बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई करून अंगणवाड्यांना पुस्तके वितरित केली जाणार आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणात होत असलेल्या बदलांपाठोपाठ आता पूर्वप्राथमिक स्तरापासूनचे बदल सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (latest marathi news)

Implementation of National Education Policy will be started in Anganwadi
Nashik Teachers Constituency : शिक्षक लोकशाही आघाडीत नाशिक विभागात फूट

पंचकोश पद्धतीचा स्वीकार

अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके देणे उपयुक्त ठरणार आहे, पण त्यासोबत शिक्षकांचे प्रशिक्षणही महत्त्वाचे आहे. त्यातून या स्तरावर अपेक्षित असलेले बदल साध्य करता येतील. बालवाडीच्या स्तरावर विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होत असतो. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पंचकोश पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार तयार केलेली पुस्तके शिक्षकांना दिली जाणार आहेत

पुस्तकनिर्मिती अंतिम टप्प्यात

पूर्वप्राथमिक स्तरावर शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची सुरवात शासकीय अंगणवाड्यांपासून केली जाणार आहे. त्यात १ लाख ३१ हजार अंगणवाड्यांना अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत. पहिल्यांदाच पूर्वप्राथमिक स्तरावर औपचारिक अभ्यासक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. पूर्वप्राथमिक स्तरासाठीची पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर पाठ्यपुस्तकांची छपाई करून ती शिक्षण विभागाच्या माध्यमातून अंगणवाड्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत.

Implementation of National Education Policy will be started in Anganwadi
Nashik ZP News : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना यंदा ‘ब्रेक’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.