Nashik Crime News : जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असताना तोतया महिला सेविकेकडून रुग्णांच्या नातलगांना मदतीच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले होते. याची कुणकुण लागताच सिव्हिल पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने शोध घेत तिला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीतून तिचे आणखी काही गैरप्रकार समोर येण्याची शक्यता आहे. ( In civil police caught fake maid who looted poor people )