Nashik Monsoon : पावसाचे माहेरघर आणि धरणांचा तालुका म्हणून इगतपुरीची सर्वत्र ओळख आहे. या तालुक्याचे पर्जन्यमान सरासरी ३ हजार २२५ मिमी इतके आहे. तालुक्यातील सात धरणांवर चार जिल्ह्यांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. यावर्षी तर इगतपुरी शहरासह, घाटमाथ्यावर व तालुक्यात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे सरासरी ४ महिन्यांत पडणारा पाऊस २ महिन्यांतच बरसला आहे. आज (ता. १२) अखेर तालुक्यात एकूण २ हजार १८३ मिमी पाऊस झाला आहे. ( In Igatpuri taluka 4 dams overflow including darna dam )