Nashik News : नांदगाव तालुक्यात 90 टक्के पेरण्या पूर्ण, मात्र वरुणराजाने पाठ फिरविल्याने वाढली चिंता

Nashik News : दुष्काळामुळे भेगाळलेल्या जमिनीला मृगाच्या पावसाने चिंब-चिंब भिजविले अन मोठ्या आशेने मृग नक्षत्राचा मुहूर्त साधून पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांपुढे आता मोठ्या पावसाची चिंता सतावत आहे.
A comforting germination after sowing along the Jatpura road near the city.
A comforting germination after sowing along the Jatpura road near the city.esakal
Updated on

नांदगाव : दुष्काळामुळे भेगाळलेल्या जमिनीला मृगाच्या पावसाने चिंब-चिंब भिजविले अन मोठ्या आशेने मृग नक्षत्राचा मुहूर्त साधून पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांपुढे आता मोठ्या पावसाची चिंता सतावत आहे. गेल्या वर्षी एकामागे एक सगळी नक्षत्रे कोरडी गेल्यावर यंदाच्या समाधानकारक पावसाने तालुक्यात मोठ्या उमेदीने पेरण्यांच्या कामाला वेग आला. तालुक्यातील ६० हजार ८१४ हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ४० हजार ९३० हेक्टरात पेरण्या आटोपत आल्या आहेत. (Nandgaon taluka 90 percent sowing is complete)

यंदा ६७.३० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका, बाजरी, कपाशी, सोयाबीनसह अन्य कडधान्ये व तृणधान्ये अशा पिकांची काहीअंशी पेरणी केली आहे. सर्वाधिक कल मका व कपाशी या नगदी पिकांकडे असून, पेरण्या झालेल्या क्षेत्रात उगवण बऱ्यापैकी असली, तरी काही भागात अजूनही काही बियाणे उतरलेले नाही.

पुरेसा पाऊस झाला तर त्याही ठिकाणी उगवण होईल, अशी आशा बाळगून पावसाच्या आगमनाकडे बळीराजाच्या नजरा लागल्या आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा ओढा मका व कपाशीकडे दिसून आला आहे. तालुक्यात कपाशी सात हजार ८२४ हेक्टरात पेरण्यांचे उद्दिष्ट असून, त्यापैकी सात हजार ९९ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या.

म्हणजे एकूण कपाशीचा यंदाचा पेरा ९०.९२ टक्के सर्वधिक असून, तो अन्य पिकांपैकी सर्वाधिक आहे. सत्तावीस हजार ६६० हेक्टरमध्ये मका पेरा झाला असून, तो ९३.४८ टक्के एवढा आहे. आकाशात ढगांची गर्दी होत असली, तरी वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगामुळे वाहून जाणारे ढग काही केल्या बरसत नाही. महागडी खते बियाण्यांची खरेदी करून मोठ्या उमेदीने पेरण्या आटोपल्या. मात्र, आज मृग नक्षत्र संपले तरीही उघडीप दिलेल्या पावसाने हजेरी लावली नाही. (latest marathi news)

A comforting germination after sowing along the Jatpura road near the city.
Nashik Road Construction : पावसाळ्यातही एकेरीच वाहतूक राहणार; भावडबारी ते देवळा

दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने पेरण्यांच्या कामाला वेग आला होता. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. पावसाने पूर्णतः उघडीप दिल्याने येत्या तीन-चार दिवसांत पाऊस न झाल्यास ही पिकेही कोमेजण्याची भीती आहे. गिरणा धरणाच्या जलाशयातही वाढ झालेली नाही.

तर माणिकपुंज, मन्याड, नाग्यासाक्या धरणाचे जलाशय अजूनही ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. शाकंबरी, लेंडी, पांझण, मन्याड या प्रमुख नद्या अजूनही कोरड्याच आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारे दहेगाव धरण क्षेत्राच्या वरच्या भागात पाऊस बऱ्यापैकी झाला असला, तरी या धरणात अजूनही पाण्याचा संचय होऊ शकलेला नाही.

पेरण्या झालेले एकूण क्षेत्र

ज्वारी ः १७ हेक्टर ५%

बाजरी ः ३७६९ हेक्टर २२.८६%

इतर तृणधान्य ः ४३ हेक्टर

तूर ः ६२ हेक्टर ८.८१%

मूग ः १४६२ हेक्टर ७२%

उडीद ः एक टक्का

भुईमूग ः ४२४ हेक्टर १८.४१%

तीळ ः ३ हेक्टर

सोयाबीन ः २२४ हेक्टर २३%

A comforting germination after sowing along the Jatpura road near the city.
Nashik News : जिल्‍हा बँकेचे प्रशासक, सीईओंना ठार मारण्याची धमकी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.