Nashik News : गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण पंचवटी विभागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. असे असले तरी महापालिका पंचवटी मलेरिया विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली जात नसल्याने मलेरिया विभाग सुस्त झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पंचवटी विभागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरिया विभागाकडून नियमित औषध व धूर फवारणी केली जात असल्याचा दावा केला जात आहे. (In Panchavati division mosquito infestation due to smoke drug spraying )
असे असले तरी काही दिवसांपासून परिसरातील अनेक भागात धूर व औषध फवारणी केली जात नसल्याने मलेरिया विभागाने केलेला दावा पूर्ण फोल फोल ठरला आहे. परिसरातील अनेक भंगार दुकाने, टायर्स पंक्चर दुकाने, खासगी बांधकामे या ठिकाणी डेंगी सदृश डासांची उत्पत्ती होत आहे. तरीही या ठिकाणी औषध फवारणी केली जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांना डेंगी सदृश आजार उद्भवण्याची दाट शक्यता आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी मलेरिया विभागाचे काम सुस्त असल्याने अधिकारी व कर्मचारी नेमके काय काम करतात, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. (latest marathi news)
उपाययोजना नाही, केवळ दंड वसुली
पंचवटी विभागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याची कबुली खुद्द पंचवटी मनपाच्या मलेरिया विभागाचे कर्मचारी देत आहेत. ज्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्या भागात प्रतिबंधात्मक डास निर्मूलन मोहीम राबविणे गरजेचे असताना पंचवटी मलेरिया विभागाचे अधिकारी व कर्मचारी केवळ हजारो रुपये दंडाच्या पावत्या फाडून दंड वसूल करण्याचे काम करत असल्याचे बोलले जाते. मात्र प्रत्यक्षात त्या भागात औषध फवारणी केली जात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
''शहरात तीन ते चार दिवसांपासून संततधार होती. यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने डेंगी, मलेरिया, चिकूणगुनिया यांसारखे आजार वाढले आहे. प्रशासनाने मलेरिया विभाग सक्रिय करून औषध फवारणी करावी तसेच पंचवटी विभागातील सहा प्रभागांमध्ये नियमित धूर फवारणी करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात येईल.''- किरण पानकर, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.