Nashik News : विधी संघर्षीत मुलाने बालकाला पाण्यात फेकले; खेळतानाची घटना

Nashik : शहरातील दातारनगर भागातील हलवई मशिदीजवळील कारखान्यामागे साचलेल्या सांडपाण्यात विधीसंघर्षीत तेरा वर्षीय मुलाने त्याच्यासमवेत खेळणाऱ्या साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्याच्या नाल्यात फेकल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
drowns
drownsesakal
Updated on

Nashik News : शहरातील दातारनगर भागातील हलवई मशिदीजवळील कारखान्यामागे साचलेल्या सांडपाण्यात विधीसंघर्षीत तेरा वर्षीय मुलाने त्याच्यासमवेत खेळणाऱ्या साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्याच्या नाल्यात फेकल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. बालकाच्या नाका-तोंडात सांडपाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ५) घडली. दातारनगर भागात राहणारे चार बालके विधीसंघर्षीत तेरा वर्षीय मुलासह खेळत होती. (nashik In ritual conflict boy throws child into water in malegaon marathi news)

खेळतांना ही मुले सांडपाण्याच्या डबक्याजवळ गेली. काहीवेळ येथे ही बालके घुटमळली. यानंतर संशयित तेरावर्षीय मुलाने हस्सान मलीक मुदस्सीर हुसेन (वय साडेतीन वर्षे, रा. दातारनगर) या याला सांडपाण्याच्या डबक्यात फेकून दिले. सुरुवातीला सांडपाण्यात बुडून या चिमुलक्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय होता. (latest marathi news)

drowns
Nashik Crime News : देहविक्री चालणार्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; 2 महिलांची सुटका

बालकाच्या कुटुंबियांनी माजी नगरसेवक शेख खालीद हाजी यांच्या सूचनेवरुन सांडपाण्याच्या डबक्यानजीक कारखान्यात व अन्यत्र सीसीटीव्ही आहे का याची चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी कारखान्याचा सीसीटीव्ही तपासला असता ही घटना निदर्शनास आली. पवारवाडी पोलिस ठाण्यात विधी संघर्षीत बालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व उर्वरित बालकांकडून माहिती घेऊन या संशयिताला ताब्यात घेऊ, असे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने शहरातील नाले, सांडपाण्याचे डबके बुजवावेत. नव्याने वसाहत, कारखाने झालेल्या भागात गटार, रस्त्यांची सोय करावी, नागरी सुविधा अग्रक्रमाने पुरवाव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

drowns
Nashik Crime News : देहविक्री चालणार्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; 2 महिलांची सुटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.