Nashik News : मिरची पिकावर घुबड्या रोगाचा प्रादुर्भाव; निफाडच्या पूर्वपट्यात औषध फवारूनही उपयोग होईना

Nashik : प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी औषध फवारूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे.
Incidence of downy mildew on pepper despite spraying with drugs.
Incidence of downy mildew on pepper despite spraying with drugs.esakal
Updated on

Nashik News : निफाड पूर्व परिसरातील मिरची पिकावर घुबड्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी औषध फवारूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. इतर शेतीपिकात मिळत असलेल्या अल्प मोबदल्यामुळे परिसरातील शेतकरी मिरची पिकाकडे वळले. उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी असल्याने प्लास्टिक पेपर आच्छादित ठिबक सिंचन पद्धतीने मिरचीची लागवड केली आहे. ( Incidence of Ghubdya disease on chilli crop in niphad )

पूर्वपट्यात समस्या

मार्च महिन्यात लागवड केलेली मिरची जून,जुलै महिन्यात तोडणीसाठी तयार होते. या कालावधीत मिरची विक्री करून शेतकऱ्यांकडे पैसा येतो. खरीप हंगामाला सुरवात झाल्याने मिळालेल्या उत्पन्नातून खरीप पेरणीसाठी बी-बियाणे,खते, मजुरी, मशागत खर्च भागविला जातो. खरीपाच्या तयारीसाठी भांडवल, घर खर्चासाठी, मुलांच्या शैक्षणिक फी आणि शालेय साहित्याच्या सर्व आर्थिक गरजा मिरची पिकातून मिळालेल्या पैशातून भागवता येतात.

त्यामुळे मिरची हे शेतकरी अर्थकारणाचे महत्त्वाचे नगदी पीक म्हणून लोकप्रिय आहे. हिरव्या मिरचीची मागणी नेहमीच जास्त असते त्यामुळे मिरची हमखास नफा देणारे पीक आहे.या पिकामुळे मजुरांना रोजगार मिळतो. शेतीवर आधारित खते,कीटकनाशके, ठिबक, बांबू, तार या संबंधित व्यवसायांची मोठी आर्थिक उलाढाल होते.

मालवाहतूक ट्रक, टेम्पो, पिकअप आदींना भाडे मिळते. परंतु चालू वर्षी पाण्याच्या कमतरतेमुळे आणि एप्रिल मे मधील तप्त उष्णतेमुळे लागवडीनंतर लगेच मिरचीची रोपे जळी पडून खराब झाली. उन्हाने जळालेल्या रोपांच्या जागेवर नवीन रोपे लावावी लागली. त्यामुळे मिरची तोडणी करण्यास उशिरा आली. (latest marathi news)

Incidence of downy mildew on pepper despite spraying with drugs.
Nashik News : डंपरमधून पडणारी वाळू, खडी बेतते जीवावर!

प्रादुर्भावाने त्रस्त

अतिउष्णतेमुळे मिरची पिकांची वाढ व्यवस्थित झाली नाही. त्यातच मिरची पिकावर घुबड्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत झाला आहे.या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी अनेक महागड्या औषधांची फवारणी करूनही घुबड्या रोगाचा बंदोबस्त झालेला नाही.मिरची दरामुळे बाजारात ग्राहकांना ठसका येत असला तरी मिरची पिकवणारा शेतकरी ही रोगांचा बंदोबस्त करताना त्रासलेला आहे.

दर तेजीत असूनही रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटल्याने हवे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. रोगामुळे शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर पडतात. वाकडी होऊन वरखाली वळलेली दिसतात. झाडाची प्रतिकारशक्ती कमी होते. रोगग्रस्त झाडाला फुले कमी लागतात किंवा फुले लागणेसुद्धा बंद होते.

''मिरची उत्पादित करतांना रोगराईचा प्रादुर्भाव खूप होत असतो. यंदा वातावरणातील बदलाने महागडी औषधे फवारणी करूनही मिरची वरील रोग नियंत्रण करणे शक्य झालेले नाहीत. परिणामी खर्चात वाढ आणि उत्पादनात घट आल्याने चांगले बाजारभावात असूनही उत्पन्न जेमतेमच मिळाले.''- विठ्ठल बडवर, मिरची उत्पादक शेतकरी,वाकद)

Incidence of downy mildew on pepper despite spraying with drugs.
Nashik News : पावसाच्या माहेरघरीही वरुणराजाची पाठ; दारणा धरणात 3.64 ,मुकणेत 2.54

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.