Nashik News : आदिवासी भागात सिकलसेलचे प्रमाण जास्त; जिल्ह्याभरात 360 रुग्ण

Nashik : केंद्र सरकारने २००९ पासून सिकलसेल राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रम हाती घेतलेला असतानाही सिकलसेलच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही.
sickle cell disease
sickle cell diseaseesakal

Nashik News : केंद्र सरकारने २००९ पासून सिकलसेल राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रम हाती घेतलेला असतानाही सिकलसेलच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. आदिवासी भागात होणारे सिकलसेल रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे वाहक (कॅरिअर) तीन हजार ७९७ व रुग्ण (सफरर) ३६० रुग्ण आहेत. या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील डे केअर सेंटरमध्ये नियमित औषधोपचार सुरू आहेत. ( incidence of sickle cell is high in tribal areas 360 patients in district )

राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दरवर्षी १९ जून हा दिवस जागतिक सिकलसेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा आरोग्य विभागाने गेल्या वर्षी एक लाख ७० हजार रुग्ण तपासणीचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. आरोग्य विभागाने हे उद्दिष्ट पूर्ण करीत दोन लाख ३६ हजार रुग्णांची तपासणी केली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी आरोग्य विभागाने एक लाख ७० रुग्ण तपासणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सिकलसेल आजार हा अनुवंषिक असून, यात लाल रक्तपेशी आपला गोल आकार बदलून कोयत्याच्या आकाराच्या होतात. सिकलसेल असलेल्या रक्तपेशी रक्तवाहिन्यांमधून सहज वाहून जाऊ शकत नाहीत. त्या घट्ट आणि चिकट होतात. त्यांचा पुंजका होतो व रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. अवयवांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने ते निकामी होतात. (latest marathi news)

sickle cell disease
Nashik News : बिहार योग विद्यालयामार्फत 5 जुलैपासून योग साधना सत्र!

ही आहेत लक्षणे

- हाता-पायांवर सूज येणे, रक्तवाहिन्यांत अडथळे, हाडे व सांध्यांवर सूज.

- असह्य वेदना हे प्रमुख लक्षण आहे. रक्तपुरवठा खंडित होऊन अवयवांत वेदना

- पक्षाघात होतो, मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये या पेशी अडकल्यास पक्षाघात होतो

- मानसिक त्रास वारंवार, मनाचे संतुलन बिघडते

- जंतूसंसर्ग, पाच वर्षांखालील बालकांत जंतुसंसर्गाचे प्रमाण जास्त असते

असे करावे आजाराचे निदान

प्राथमिक चाचणी व निश्चित निदान चाचणी- सिकलसेल आजारात निदान रक्ताची तपासणी करून करता येते. सोल्युबिलिटी चाचणी ही प्राथमिक चाचणी आहे व यासाठी रक्ताचे फक्त दोन थेंब लागतात. ही चाचणी ५ ते १० मिनिटांत होते. ही चाचणी सर्व आरोग्य संस्थांमध्ये त्याचप्रमाणे शिबिरात करण्यात येते.

असे आहे औषधोपचार

सिकलसेल आजारावर कायमचा उपचार उपलब्ध नाही. सिकलसेल रुग्ण व्यक्तींनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी व रक्तचाचणी करून घेतली आणि योग्य आहार घेतल्यास त्याची आयुष्याची वयोमर्यादा वाढू शकते. देशातील सिकलसेल रुग्णांना मोफत रक्त देण्याची घोषणा करण्यात आली. रेल्वे प्रवास भाड्यात सिकलसेल रुग्णांना सवलत देण्यात येत आहे.

sickle cell disease
Nashik News: शिवशाही बसच्या टायरचे रीमोल्ड कव्हर गळून पडते तेव्हा...; शिर्डी मार्गावर बस अपघातग्रस्त होण्यापासून बचावली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com