Nashik News : वीजपुरवठा बंद न करताच काम करताना दोघांचा मत्यू; विटावे येथील घटना

Nashik : विटावे (ता. चांदवड) येथे वीजवाहिनीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून नंदुरबार जिल्ह्यातील दोन मजुरांचा आज मृत्यू झाला.
Sotya Padavi
Sunil Khuma Valvi
Sotya Padavi Sunil Khuma Valviesakal
Updated on

Nashik News : विटावे (ता. चांदवड) येथे वीजवाहिनीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून नंदुरबार जिल्ह्यातील दोन मजुरांचा आज मृत्यू झाला. चांदवड पोलिसांत कंत्राटदार, वायरमन व ट्रॅक्टर क्रेनचालक यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटावे गावातील गावठाण डीपी परिसरात खासगी ठेकेदारामार्फत वीजवाहिनीचे काम मंगळवारी (ता. ६) सकाळी अकराच्या सुमारास सुरू होते. (Incident of two people in Mathew Vitave while working without shutting off electricity supply )

हे काम सुरू असताना वीजपुरवठा बंद असल्याचा परवाना संबंधित ठेकेदाराकडून बंधनकारक असताना तसे न करता ठेकेदाराने काम सुरू ठेवले. या वेळी वीजवाहिनीचा खांब उभा करीत असताना शेजारून गेलेल्या ११ केव्हीच्या मुख्य वाहिनीला स्पर्श झाला अन खांबात वीज प्रवाह उतरला, यामुळे खांब उभा करीत असलेले केवलसिंग ऊर्फ केवल्या सोत्या पाडवी (वय २७, रा. देवमोगरानगर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) व सुनील खुमा वळवी (२२, रा. आशिषनगर, ता. शहादा, जि. नंदुरबार) या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर दोन्ही मजुरांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला व प्रथमदर्शनी या घटनेत दोषी असलेले ठेकेदार दत्तू नामदेव पवार (रा. रायपूर), वायरमन उज्ज्वल मधुकर ढेमे (रा. चांदवड), ट्रॅक्टर क्रेनचालक भावराव रमण खुरसणे (रायपूर) या तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

Sotya Padavi
Sunil Khuma Valvi
Nashik News : ठिबक सिंचनाच्या 25 कोटींच्या अनुदानापासून शेतकरी वंचित; आंदोलनाचा इशारा

पुरवठा बंद न करता काम

विटावे येथील घटनेबाबत ‘महावितरण’चे विद्युत निरीक्षक बी. के. उगले व उपअभियंता उमेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. उपलब्ध असलेल्या परिस्थितीजन्य पुराव्याचा विचार करता वीजपुरवठा बंद न करता निष्काळजीपणे वीज नियमांचे उल्लंघन करीत काम केल्याची प्राथमिक माहिती विद्युत निरीक्षक उगले यांनी दिली. याबाबतचा अहवाल महावितरण कंपनीच्या वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेबाबत संबंधित कनिष्ठ अभियंता गौरव गायकवाड यांच्याशी चर्चा केली असता, संबंधित कामाची कुठलीही माहिती नव्हती. किंवा कोणतीही परवानगी दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून परवानगी नसताना ठेकेदार विजेचे संबंधित काम करीतच कसे होते, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच, ठेकेदारांची मनमानी वाढली की अधिकाऱ्यांनी अकार्यक्षमतेचा कळस गाठला, असा प्रश्न कायम आहे. तालुक्यातील गावांमध्ये वीजवाहिनीचे काम सुरू असून, अशोका कंपनीमार्फत काम सुरू आहे.

Sotya Padavi
Sunil Khuma Valvi
Nashik News : ‘जेएनपीए’चे शैक्षणिक संस्‍थांना बळ; ‘सीएसआर’ निधीतून सीएचएमईला 50 लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.