Nashik News : शहरातील सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांची संख्या अधिक वाढल्याने परिणामी अपघातांत वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात सामान जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. मुंबई नाका, फेम सिनेमा, त्र्यंबक नाका सिग्नल येथे कारवाई करण्यात आली. वास्तविक बेगर हाऊसमध्ये भीक मागणाऱ्यांची रवानगी करणे अपेक्षित आहे. ( Increase in accidents due to increase in number of begging children )
मात्र सामान जप्त करून त्यांची सिग्नलवरून हटण्याची मानसिकता केली जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. यापूर्वी अनेकदा भीक मागणाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. वारंवार कारवाई होत असल्याने भीक मागणाऱ्या महिलांकडून दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. भीक मागण्याबरोबरच काही जण पेन, गजरे किंवा गरजेच्या अन्य वस्तूंची विक्री करतात.
मुख्यत्वे सर्वांचाच हेतू पैसे मागण्याचा असतो. माल विकत घेऊन पैसे द्या किंवा भीक द्या, अशी भूमिका असते. पैसे न दिल्यास वाहनधारकांना शिवीगाळ करतात. चारचाकी वाहनांच्या काचांमधून डोकावताना अनेक जण दिसत नाही. भीक न दिल्यास अन्य वाहनांकडे वळतात. परंतु त्यांची हालचाल लक्षात येत नाही. यातून अपघात होतात. (latest marathi news)
अपघातानंतर सिग्नलवरील भीक मागणारे, वस्तूविक्रेते, तसेच सिग्नल परिसरातील त्यांचे कुटुंबीय वाहनधारकांवर चाल करून येतात. एकापेक्षा अधिक लोक शिवीगाळ करत चालून येत असल्याने वाहनधारकांमध्ये दहशत आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने तपोवनात तात्पुरते निवारा शेड उभारण्यात आले आहे. तेथे भिकाऱ्यांना ठेवले जाते.
परंतु ते कायमस्वरूपी नाही. कायमस्वरूपी जबाबदारी घेणे महापालिकेला बंधनकारक नाही. शासनाच्या समाजकल्याण विभागाकडेदेखील अशा प्रकारची व्यवस्था नाही. भिकाऱ्यांची सोय करण्यासाठी यंत्रणा नसल्याने सिग्नलवर गर्दी वाढली आहे. त्यातून बकालपणा, अपघात या समस्या वाढल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.