Nashik Fraud Crime : शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरणी तक्रारीत वाढ

Nashik : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसंदर्भात हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना आकर्षित केल्यानंतर आर्थिक गुंतवणूक घेऊन पसार झालेल्या दोघांविरोधात शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रारी वाढल्या आहेत.
Nashik Fraud Crime
Nashik Fraud Crimeesakal
Updated on

Nashik News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसंदर्भात हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना आकर्षित केल्यानंतर आर्थिक गुंतवणूक घेऊन पसार झालेल्या दोघांविरोधात शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रारी वाढल्या आहेत. तर दोघा संशयितांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हेशाखेची पथके मागावर आहेत. (Increase in complaints in case of share market investment fraud)

संशयित संदीप माळे आणि नीलेश हिरालाल बहिरे अशी दोघा संशयितांची नावे आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्याच पैशांवर जास्तीचा परतावा मिळेल, असे सांगून संशयित दोघा शेअर मार्केट तज्ज्ञाने एकाला साडेआठ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदारांचा शहर गुन्हेशाखेकडे ओघ वाढला आहे. आत्तापर्यंत शहर गुन्हेशाखेकडे १५ तक्रारी आल्या असून फसवणुकीचा आकडा कोटीपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. पोलिसांनी एका तक्रारदाराची तक्रार दाखल करून घेतली असून संशयितांनी त्यांची ५० लाखांची फसवणूक केली आहे.

सप्टेंबर २०२३ मध्ये संशयित संदीप मुळे आणि नीलेश यांनी म्हसरुळ पोलिसांच्या हद्दीतील शहीद अरुण चित्ते पुलाजवळील एका बँक्वेट हॉल आणि हॉटेलमध्ये शेअर मार्केटसंबंधीत सेमिनार घेतला होता. ‘एसटी’ शेअर ट्रेडिंग कंपनीच्या बॅनरखाली संशयित दोघांनी गुंतवणूकदार आकर्षित केले होते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यानंतर त्यांना पहिल्या महिन्यात परतावा मिळाला. (latest marathi news)

Nashik Fraud Crime
Chakan Crime : चाकण-तळेगाव मार्गावर 'या' सराईत गुंडाचा खून; डोक्यात कोयत्याने सपासप वार, दोघे आरोपी फरार

परंतु दुसऱ्या महिन्यापासून परतावा मिळाला नाही. त्यामुळे गुंतवणूकदार त्याच्या कार्यालयात पोचले असता ते बंद होते. संशयित संपर्कात नसल्याने अखेर शहर गुन्हेशाखेकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हेशाखेचे सहायक निरीक्षक किशोर कोल्हे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

"शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. अशाप्रकारे फसवणूक झालेल्यांनी शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार नोंदवावी."- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

Nashik Fraud Crime
Jalgaon Crime: शहापूरला डोक्यात दगड टाकून विधवा महिलेचा निर्घृण खून! संशयाने पछाडलेल्या प्रियकराचे कृत्य; संशयित अटकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.