नाशिक : औद्योगिक वापराचे वीजदर, इंधन व गौण खनिजांच्या दरवाढीमुळे बांधकाम साहित्य महागल्याने परिणामी घरांच्या किमतीमध्ये पाचशे रुपये चौरस फुटांपर्यंत वाढ झाल्यानंतर आता बांधकाम कारागिरांनी देखील दर वाढविले आहेत. पहिल्या दोन मजल्यानंतर प्रत्येक मजल्यासाठी दीडशे रुपये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर परिणामी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्राला त्याचा सर्वाधिक फटका बसला. तब्बल चार महिने बांधकामे बंद राहिल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले. घरांना मागणी घटल्याने गृह कर्जावर परिणाम झाला.
त्यामुळे दोन ते अडीच टक्क्यांनी गृह कर्जाचे दर खाली आले. कोरोना दुसऱ्या लाटेत नियमावली पाळून बांधकामे सुरू असल्याने बांधकामांची गाडी रुळावर येण्यास सुरवात झाली. याच दरम्यान नोव्हेंबर २०२० मध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अधिक एफएसआय देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू झाले. गृहकर्जाचे कमी झालेले दर, बांधकाम प्रकल्पांचा विस्तारामुळे व्यवसायात तेजी निर्माण झाली.
परंतु, बांधकाम साहित्याचे दर सातत्याने वाढत असल्याने तेजीचे रूपांतर मंदीत होण्यास सुरवात झाली आहे. बांधकाम साहित्यामध्ये ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने घरांच्या किमती वाढविणे अपरिहार्य झाल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांकडून करताना प्रतिचौरस फुटामागे चारशे ते पाचशे रुपये वाढ झाली आहे.
इंधन दरवाढ कारणीभूत बांधकाम साहित्याच्या दरवाढीला इंधन दरवाढ कारणीभूत आहे. इंधन दरवाढीमुळे इतरही महागाई वाढल्याने जुन्या दरात काम परवडत नसल्याने बांधकाम कारागीर व मजुरांचे दर वाढविण्यात आले आहे. कारागिरांचा पूर्वीचा रोजचा दर आठशे ते हजार रुपये होता. त्यात वाढ करताना आता उंच इमारतींच्या पहिल्या दोन मजल्यांचा दर पूर्वीप्रमाणे कायम ठेवताना दोन मजल्यांच्या वर प्रतिमजला दीडशे रुपये रोज याप्रमाणे वाढ करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.