Nashik News : आरोग्यवर्धक गुणांमुळे ‘ज्वारी’ला सुगीचे दिवस; मागणीमध्ये वाढ

Nashik : आपल्या आहारामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चपाती, भाकरीमध्ये बाजरीची भाकर हे सुद्धा मोठ्या प्रमाणात सेवन केली जाते.
jowar
jowaresakal
Updated on

Nashik News : आपल्या आहारामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चपाती, भाकरीमध्ये बाजरीची भाकर हे सुद्धा मोठ्या प्रमाणात सेवन केली जाते. मात्र पूर्वीच्या काळी गरीब किंवा दुय्यम दर्जाची भाकरी म्हणून ज्वारीची आहारात असायची. मात्र, आता याच ज्वारीला सुगीचे दिवस आले आहे. वजन कमी करण्याचे उद्दिष्ट आरोग्याबद्दल निर्माण जागरूकता व ज्वारीचे फायदे यामुळे ज्वारीला सुगीचे दिवस आले आहे. (Increase in demand for Jowar on harvest day due to its health benefits )

सध्या बाजारामध्ये आरोग्यवर्धक ज्वारी ४० ते ४५ रुपये प्रति दराने विकली जात आहे. वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी ज्वारीची भाकरी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. ज्वारीच्या भाकरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते.ज्यामुळे आपले पोट बऱ्‍याच काळासाठी भरलेले राहते. याशिवाय यात मॅग्नेशिअम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

ज्वारीचे पीठ पाचन शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात. ज्वारी व्हिटामिन 'सी' चा मुख्य स्रोत आहे. ज्वारी नैसर्गिकरित्या ग्लूटेन- मुक्त आहे, त्यामुळे ग्लूटेन संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींसाठी एक योग्य धान्य पर्याय बनतो. (latest marathi news)

jowar
Nashik News : खर्च 40 हजार अन्‌ उत्पन्न 10 हजार; राजापूरचे शेतकरी विठ्ठल वाघ यांनी कोथिंबरीवर फिरवला नांगर

सर्वांसाठी फायदेशीर

ज्वारीमध्ये टॅनिन सारखी संयुगे असतात. ज्यात ॲण्टीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ही संयुगे (एलडीएल) कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास, रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात. जे सर्व हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय योग्य आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करते. यामुळे मधुमेह किंवा पूर्व-मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी एक फायदेशीर पर्याय बनते.

ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि फॉस्फरससह आवश्यक खनिजांचा समृद्ध स्रोत आहे. मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्याचे नियमन करण्यास मदत करते, पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणास समर्थन देते, ऑक्सिजन वाहतुकीसाठी लोह महत्त्वपूर्ण आहे आणि फॉस्फरस हाडांचे आरोग्य आणि ऊर्जा उत्पादनात भूमिका बजावते. ज्वारीमध्ये असलेले टॅनिन काही खनिजांचे शोषण वाढवतात.

''वजन कमी करण्यासाठी ज्वारी हा एक उत्तम पर्याय आहे. ज्वारी ही पचनास मदत करते. सर्वसाधारणपणे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा ज्वारीच्या रोटी तथा भाकरी चे सेवन नक्की केले पाहिजे. नाचणी, बाजरी, राजगीरा, मका इत्यादींचाही आहारात समावेश असावा. जैवउपलब्धता वाढविण्यासाठ ज्वारीच्या रोटीमध्ये तूप, लोणी वापरावे.''- रश्मी सोमाणी, आहार तज्ज्ञ

jowar
Nashik News : एपीएस स्टार इंडस्ट्रीजच्या भूखंडाची लिलाव प्रक्रिया सुरु; सातपूर एमआयडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.