नाशिक रोड : पावसाळा पाहता सध्या गवती चहाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांनी गवती चहाच्या जोड्या बांधायला सुरवात केली आहे. या जोड्या विविध रिसॉर्ट, हॉटेल, उपाहारगृह, बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. एक जुडी किमान ४० रुपये अशा बेताने विकली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारून त्यांना चांगला रोजगार मिळत आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. (Nashik Increase in demand for lemon grass tea due to rain)
नाशिक तालुका आणि जिल्ह्यामध्ये गवती चहाचे चांगले उत्पादन घेतले जाते. सध्या गवती चहाची कापणी मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हा गवती चहा रिसॉर्ट, उपाहारगृहे, हॉटेल आणि बाजारात विकण्यासाठी आणला जात आहे. पावसाळ्यात गवती चहा टाकून चहा पिणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
शिवाय हॉटेलमध्ये आणि जास्त पावसाच्या परिसरामध्ये हा गवती चहा आरोग्याला उष्ण आहार म्हणून मोठ्या प्रमाणावर विकला जातो. विशेष करून थंडीच्या दिवसात गवती चहा पिल्याने शरीराला उष्णता मिळते. त्यामुळे सध्या बाजारात गवती चहाला मागणी वाढली आहे.
बाजारात ४० रुपयाला जुडी विकली जात आहे. काही ठिकाणी आकारानुसार हीच जुडी वीस रुपयाला विकली जाते. त्यामुळे गवती चहाला मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शेतकरी सध्या जोड्या बांधून त्या बाजारात विकण्यासाठी आणत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारून शेतकऱ्यांना चांगला पैसा प्राप्त होणार आहे.
सध्या कापणी सुरू आहे. जुड्या बांधून रिसॉर्टला पोचवत आहोत. बाजारात मोठी जुडी ४० रुपये आणि लहान जुडी २० रुपयाला विकली जात आहे. गवती चहा बाजारात मागणी वाढली आहे. पुरवठा त्या प्रमाणात होतो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.