Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीमुळे आंबे विक्रीत दुपटीने वाढ

Ashadhi Ekadashi 2024 : बाजारात आंब्यांची १ जुलैपासून मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. येथे रोज सुमारे ५० टन आंबा विकला जात आहे.
Traders auctioning mangoes at the fruit market here.
Traders auctioning mangoes at the fruit market here.esakal
Updated on

Ashadhi Ekadashi 2024 : येथील फळफळावळ बाजारात आंब्यांची १ जुलैपासून मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. येथे रोज सुमारे ५० टन आंबा विकला जात आहे. येथील बाजारात कच्चा आंबा येत असून २० ते ६० रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. येथे दशहरी, लंगडा, चौसा या आंब्यांची रेलचेल आहे. किरकोळ बाजारात ५० ते ८० रुपये किलोने आंबा विकला जात असून येथे उत्तर प्रदेशातील आंब्याची रेलचेल वाढली आहे. त्यामुळे आषाढी एकादशीमुळे येथील बाजारात आंब्यांची विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे. (increase in mango rate due to Ashadhi Ekadashi )

फळ बाजारात फेब्रुवारी महिन्यापासून केरळमधील आंबा विक्रीसाठी येतो. सुरवातीला आवक कमी असल्याने आंब्याचे दर दीडशे ते दोनशे रुपये किलोपर्यंत राहतात. १५ मार्च ते ३० मेपर्यंत येथे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडूतील बदाम, तोतापुरी, हापूस, लालबाग हे आंबे विक्रीस येतात. १ ते ३० जूनपर्यंत येथील बाजारात गुजरातमधील आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढते. यंदा गुजरात राज्यात कैरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने त्याची जागा उत्तर प्रदेश येथील आंब्याने घेतली आहे.

गुजरातमधून केशर, राजापुरी, आम्रपाली, हापूस या जातीचा आंबा येतो. ७० ते १०० रुपये किलोने या आंब्यांची विक्री होते. दरवर्षी गुजरात येथील आंब्याने बाजार काबीज करतो. यंदा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घटल्याने उत्तर प्रदेश येथील आंब्याने त्याची उणीव भरून काढली आहे. येथे सर्वात जास्त दशहरी, लंगडा, चौसा या जातीचे आंबे येत आहेत. (latest marathi news)

Traders auctioning mangoes at the fruit market here.
Ashadhi Ekadashi 2024 : पुरातन विठ्ठलाची मुर्ती वाचवण्यासाठी निंबाळकरांनी केला गनिमी कावा, मंदिर पाहून तुम्हीही फसाल

घाऊक बाजारात २० ते ६० रुपये किलोने आंब्यांची विक्री होते. किरकोळ बाजारात ५० ते ८० रुपये किलोने आंबा विकला जात आहे. उत्तर प्रदेश येथील आंबा खायला गोड असल्याने व त्याची चव न्यारी असल्याने बाजारात त्याला मोठ्या प्रमाणात उठाव आहे. येथे रोज सुमारे ५० टन आंबे विकले जात आहेत.

स्वस्त आंब्यांमुळे आमरसाचे आमंत्रण

येथील एकात्मता चौक, सटाणा नाका, मोसम पूल, सरदार चौक, गूळबाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल, संगमेश्‍वर, सोमवार बाजार, कुसुंबा रोड, नवीन बसस्थानक परिसर यासह अनेक भागात आंब्यांच्या शेकडो हातगाड्या लावल्या जात आहेत. काही व्यावसायिक ॲपेरिक्षामध्ये आंबे भरून ५० रुपये किलोने गल्लो-गल्ली विक्री करीत आहेत. आंबे स्वस्त असल्याने बहुसंख्य नातेवाईक आमंत्रण देताना पुरणपोळी व आमरसाचे आमंत्रण देत आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात आमरस केला जात आहे.

''येथील बाजारात २० जुलैपर्यंत आंब्यांची आवक असणार आहे. ५ ऑगस्टपर्यंत येथे आंबा विक्रीस असेल. आंबा स्वस्त असल्याने अनेक हातगाड्या लागल्या आहेत. शहराबरोबरच कसमादेत आंब्याला मागणी वाढली आहे.''- हाजी निहाल बागवान नॅशनल फ्रूट कंपनी, मालेगाव.

Traders auctioning mangoes at the fruit market here.
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला काय करावे आणि काय नाही आधीच जाणून घ्या, नाहीतर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.