Nashik News : शहरातील वर्दळीच्या सिग्नलवर भिकाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ही भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांबरोबरच ज्येष्ठांचाही वापर होत आहे. गाडीच्या काचा बंद करूनही हे लोक पिच्छा सोडत नसल्याने वाहनधारकांसमोरील डोकेदुखी वाढली आहे. (Increase in number of beggars on traffic signal)
सिग्नलवरील भिकाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची ओरड होताच मध्यंतरी पोलिसांनी धडक कारवाई करत सर्वच सिग्नलवरील भिकारी हटविले होते. मात्र त्यानंतर विविध वस्तूंच्या विक्रीच्या नावाखाली पुन्हा भिकाऱ्यांनी वर्दळीच्या सिंग्नलवर उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे भीक न दिल्यास गाडीवर चरे पाडणे, विचित्र हावभाव, शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल जात असल्याचे अनेक वाहनधारकांनी सांगितले.
वृद्ध किंवा लहान मुलांना ऊन- भरपावसात भीक मागायला लावून त्यांना भिक्षा मागायला लावणारे मात्र आडोशाला व सुरक्षित जागी उभे राहतात. सिग्नल सुरू होताच वाहने भरधाव निघतात. त्यामुळे अपघाताची शक्यताही वाढते.
द्वारका सिग्नलवर सर्वाधिक भिकारी
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या द्वारका सिग्नलवर या भिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. भिक्षा मागण्याच्या निमित्ताने लहान मुलांना पुढे केले जाते. सिग्नल बंद होताच ही मुले गाडीजवळ येऊन चालकाला न विचारताच गाडीची पुढील काच कपड्याने स्वच्छ करतात. (latest marathi news)
काही सेकंदात हे काम झाल्यावर चालकाकडे भीक मागितली जाते. न दिल्यास वेळप्रसंगी शिवीगाळही केली जाते. काहीजण कचऱ्याच्या पिशव्या किंवा गजरे विकण्याच्या निमित्ताने गाडीजवळ येऊन भिक्षा मागतात.
या ठिकाणी मोठी संख्या
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी हे भिकारी आढळून येतात. यात द्वारका, गंगापूर नाका, उंटवाडी, दिंडोरी रोड, जुना आडगाव नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, ड्रीम कॅसल, आरटीओ कॉर्नर, तारवालानगर आदी ठिकाणी हे भिकारी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
"सिग्नलवरील भिकाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भिक्षा मागण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी लहान मुलांना पाठविले जाते, ही मुले वाहनांच्या वेगाबाबत गंभीर नसल्याने अपघाताची शक्यता वाढते."- राजेंद्र पोरजे, शांतिनगर, मखमलाबाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.