Nashik News : अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षणसेवक मानधनात वाढ

Nashik : उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढीचा निर्णय घेतला आहे.
salary
salary esakal
Updated on

Nashik News : शालेय शिक्षण विभागाने फेब्रुवारी २०२३ मध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढीचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आदिवासी विकास विभागाने स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या ५५६ अनुदानित आश्रमशाळांतील तब्बल ३३४ शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढीचा निर्णय घेतला. ही वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू असणार आहे. (Increase in teaching staff remuneration of aided ashram schools )

आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांमधील शिक्षणसेवकांचे मानधन व शालेय शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या शिक्षणसेवकांचे मानधन यात समानता राहावी, तसेच दरम्यानच्या कालावधीत वाढलेली महागाई, राज्य स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू केली आहे. मात्र, शिक्षणसेवकांच्या मानधनात सन २०१२ पासून वाढ झालेली नाही. (latest marathi news)

salary
Nashik News : मार्केटमध्ये राख्या खरेदीला उधाण; देव राखी महागली, घाऊक व्यापाऱ्यांची लगबग

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिकेवरील ३० जून २०२२ ला शिक्षणसेवकांना मिळणारे मानधन कमीत कमी कोणत्याही प्रकारच्या उद्योगातील वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यास देय किमान वेतनाएवढे सुधारित करावे, मानधनाचे निश्चित दर चार वर्षांतून किमान एकदा सुधारित करावेत, तसेच शिक्षणसेवकांना १५ ते २० हजार रुपये मानधन अदा करावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणसेवकांच्या मानधनात १० हजार, तर उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांच्या मानधनात ११ हजार रुपयांची वाढ होणार आहे.

असे मिळणार मानधन

पद संवर्ग आधीचे मानधन सुधारित मानधन

प्राथमिक शिक्षणसेवक ६ हजार १६ हजार

माध्यमिक शिक्षणसेवक ८ हजार १८ हजार

उच्च माध्यमिक शिक्षणसेवक ९ हजार २० हजार

salary
Nashik News : स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठ सजली; विविध वस्तू विक्रीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.