नाशिक : आठवडाभरापासून वातावरणातून गायब झालेला गारवा पुन्हा परतला आहे. पाऱ्यात घसरण झालेली असून, थंडीचा जोर वाढला. मंगळवारी (ता. १९) नाशिकचे किमान तापमान १२.७ अंश सेल्सियस, तर निफाडचे किमान तापमान १०.९ अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किंचित स्वरूपात किमान तापमान घसरल्याची नोंद हवामान खात्याने घेतली आहे.