Nashik Police : अतिसंवेदनशील परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविला! निवडणुकीसाठी सज्जता; धार्मिकस्थळांच्या सुरक्षिततेवर भर

Latest Nashik News : आगामी निवडणुकीच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत.
police protection
police protectionesakal
Updated on

Nashik Police : नवरात्रोत्सव आटोपताच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयाकडून शहरातील अतिसंवेदनशील परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तसेच, नवरात्राचा बंदोबस्त असतानाही अतिरिक्त बंदोबस्ताची सज्जता करीत शहरात गस्त वाढविण्यात आली आहे.

विशेषतः गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेचा आढावा घेत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. आगामी निवडणुकीच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. (Increased police presence in sensitive areas)

आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता येत्या आठवड्याभरात लागू होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून शहर पोलिसांकडून कडेकोट नियोजन करण्यात आलेले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनचे उपायुक्त मोनिका राऊत, मुख्यालय व वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या उपस्थितीत शहरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील आढावा सातत्याने घेतला जात आहे.

तसेच, विशेष शाखेसह गोपनीय विभागाकडूनही शहरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. आयुक्तालय हद्दीतील अतिसंवेदनशील परिसराची माहिती संकलित करून त्या ठिकाणी पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. (latest marathi news)

police protection
Sharad Pawar: शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना धक्का; नवी मुंबईतील 'हा' नेता फुंकणार तुतारी!

तसेच, शहरातील काही वादग्रस्त परिसरामध्ये पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच शहरातील प्रत्येक घडामोडींची माहिती वरिष्ठ पातळीवरून नजर ठेवली जात आहे. मुंबई नाका, अंबड, इंदिरानगर, नाशिक रोड, भद्रकाली या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच, प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या प्रभारींना दररोजच्या घडामोडींसह नियमित अहवाल आयुक्तालयाकडे सादर करण्याचे आदेशही बजाविण्यात आलेले आहेत.

पोलिस दलासाठी स्वतंत्र प्रशिक्षण

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून पोलिस दलासाठी स्वतंत्र प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी राज्य निवडणूक निर्णय अधिकारी एस. चोकलिंगम यांच्या उपस्थितीत शहर, ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांना त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यात निवडणूक काळातील बंदोबस्तांसह कारवाईसंदर्भात सूचना करण्यात आल्या.

police protection
Nashik News: आदिवासी तालुक्यांना मिळाले 311 शिक्षक! जि.प. प्राथमिक विभागाकडून नियुक्तीपत्र; पेसा क्षेत्रात कंत्राटी भरती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.