Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात २३ ते २९ मार्चदरम्यान वालपापडी- घेवड्याची आवक ५, ६९७ क्विंटल आवक झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल २ ते ५ हजार असा तर सरासरी दर साडेतीन हजार रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ३ ते ५ पाच हजार, तर सरासरी दर ४ हजार राहिला. सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढउतार झाल्याचे पाहायला मिळाले. (Nashik increases in arrival of vegetables due to heat marathi news)
हिरवी मिरचीची आवक ६०७ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ५ ते साडेसहा, तर सरासरी दर पाच हजार ७५० रुपये दर मिळाला. उन्हाळ कांद्याची आवक १०, ८२६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७५० ते १, ४५० तर सरासरी दर १, २५० रुपये राहिला. लेट खरीप लाल कांद्याची आवक १, ६५५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७५० ते १, ७५१ तर सरासरी दर १, ५०० रुपये राहिला.
लसणाची आवक ७४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४, २०० ते १३, ३०० तर सरासरी दर ८, ५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ७,२२४ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल १,४०० ते २,१५० तर सरासरी दर १,९०० रुपये राहिला.गाजराची आवक ९५५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,००० ते २,५०० तर सरासरी दर २,३०० रुपये राहिला.
फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ८० ते २५० तर सरासरी १५०, वांगी १५० ते ३२० तर सरासरी २२५, फ्लॉवर ७० ते १८० सरासरी १३० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ४० ते १६० तर सरासरी १२५ रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ३०० ते ५०० तर सरासरी दर ४२५ रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. (latest marathi news)
वेलवर्गीय भाजीपाल्यांमध्ये भोपळा १५० ते ३२५ तर सरासरी ३४०, गिलके ३०० ते ४०० तर सरासरी ३५०, काकडी २०० ते ५०० तर सरासरी ३५० तर दोडका २८० ते ५०० तर सरासरी दर ५६७ रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक १,५१० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते १,९०० तर सरासरी दर १,४०० रुपये मिळाला.डाळिंबाची आवक ४४१ क्विंटल झाली. मृदुला वाणास ३०० ते ६,५०० तर सरासरी ४,००० रुपये दर मिळाला.
मोसंबीची आवक ९४२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल २,००० ते ४,००० तर सरासरी ३,००० दर मिळाले. पपईची आवक २३५ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १,००० ते १,८०० तर सरासरी १, ५०० रुपये दर मिळाले. द्राक्ष आवक कमी झाली असून सफेद थॉमसन वाणास १,००० ते ३,००० तर सरासरी २,२०० रुपये दर मिळाले. तर काळ्या रंगाच्या शरद सिडलेस वाणास ३,००० ते ५,००० तर सरासरी ४,५०० रुपये दर मिळाला.
प्रती १०० जुड्यांचा दर
पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी
कोथिंबीर...८००...४,०००...३,०५०
मेथी...१,०००...२,८००...२,०००
शेपू...९००...२,१००...१,६००
कांदापात...२,०००...४,२००...३,२००
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.