Nashik Accident Updates : रासबिहारी लिंक रोडवर वाढते अपघात!

Nashik News : शहराचा विकास झपाट्याने होत आहे. यात पंचवटी परिसरातदेखील दिवसागणिक नागरी व लोकवस्ती वाढत आहे.
Vehicular traffic on RTO corner Rasbihari Link Road
Vehicular traffic on RTO corner Rasbihari Link Roadesakal
Updated on

Nashik Accident Updates : शहराचा विकास झपाट्याने होत आहे. यात पंचवटी परिसरातदेखील दिवसागणिक नागरी व लोकवस्ती वाढत आहे. त्यानुसार आरटीओ कॉर्नर - रासबिहारी लिंक रोडवर वाढती लोकसंख्या, अवजड, चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. या मार्गावर नेहमीच होणारे छोटे - मोठे अपघात, या सर्व बाबी बघता पंचवटीतील आरटीओ कॉर्नर, रासबिहारी लिंक रोडवर हॅम्प बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.(Increasing accidents on Rasbihari Link Road)

आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी रोडवर साईनगर लेन नंबर एक, दोन तीन चार पाच, राजमाता मंगल, श्रीरामनगर, स्वामीनगर, औदुंबर लॉन्स, अक्षता लॉन्स, अवधूत कॉलनी, अनूसयानगर, कळसकरनगर, बळीराज कॉलनी, गजानन कॉलनी, शुभम कॉलनी, मानेनगर दत्तात्रेय चौक, म्हस्केनगर, मीरा द्वार हॉल शिवसागर कॉलनी, निर्मलनगर, साईशिवनगर, श्रीपाद कॉलनी, प्रमोद महाजन उद्यान.

वाघ कृषी महाविद्यालय, श्री चक्रधर नगर, सरस्वतीनगर आदी भाग आहे. सदर भागाचा झपाट्याने विकास होत असून लोकवस्तीत वाढ झाली आहे. रासबिहारी लिंक रोड हा दिंडोरी रोड व मुंबई महामार्गास जोडणारा दुवा आहे. या मार्गाने अवजड तसेच चारचाकी दुचाकी या वाहनांची नेहमी वर्दळ असते.

तसेच या मार्गावरील राजमाता मंगल कार्यालय, औदुंबर लॉन्स अक्षदा लॉन्स मीरा दातार मंगल कार्यालय आहे लग्न सोहळा व विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या रूपाने येथील रोडवर सारखी वर्दळ असते. तसेच दिवसागणिक बळी मंदिरासमोर उड्डाणपूल उतरत व चढत असल्याने जवळचा मार्ग म्हणून दिंडोरी व पेठकडून मुंबई, पुणे, औरंगाबादकडे ये जा करणाऱ्या वाहनांची व प्रवासी वाहतूक यांची प्रचंड प्रमाणात गर्दी वाढली आहे. (latest marathi news)

Vehicular traffic on RTO corner Rasbihari Link Road
Nashik News : पोलिसांनी कारवाई करावी : आयुक्त प्रवीण गेडाम

आरटीओ ऑफिस ते गोरक्षनगर मार्गे आरटीओ कॉर्नरपर्यंत किमान राजमाता मंगल कार्यालयाच्या अलीकडे व मोराडे वस्ती वळण रस्ता त्रिकोणी बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अलीकडे प्रमोद महाजन गार्डन अलीकडे हॅम्प बसवावे. जेणेकरून भरघाव वेगाने येणाऱ्या वाहनाचा वेग कमी होईल आणि त्यामुळे छोटे मोठे अपघात टळतील.

"आरटीओ कॉर्नर रासबिहारी लिंक रोड या मार्गातून वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू असते. मार्गावर नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात. सदर अपघात रोखण्यासाठी या मार्गावर जवळपास चार ठिकाणी हॅम्प बसविणे आवश्यक असून याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करीत, त्याअनुषंगाने लवकरात लवकर पावले उचलावी." - राहुल मोराडे, स्थानिक रहिवासी

Vehicular traffic on RTO corner Rasbihari Link Road
Nashik Child Malnutrition News : सुरगाणा तालुक्यात 13 बालके कुपोषणमुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.