Nashik Summer Heat: वाढत्या उन्हामुळे शहाळ्यांचे महत्त्व वाढले! किमतीत 2 महिन्यातच दुप्पट वाढ; ग्रामीण भागातूनही मागणी वाढू लागली

Nashik News : राज्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून मालेगाव शहरालाही उष्णतेच्या लाटेने कवेत घेतले आहे.
Professionals selling coconuts in Khadjin area of ​​Malegaon.
Professionals selling coconuts in Khadjin area of ​​Malegaon.esakal
Updated on

मालेगाव : राज्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून मालेगाव शहरालाही उष्णतेच्या लाटेने कवेत घेतले आहे. येथे पारा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी वाढली आहे. शितपेयांबरोबरच शहाळेच्या (नारळ) किमतीही गगनाला भिडत चालल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी ३५ रुपयांना मिळणारे शहाळे आता थेट ६० ते ६५ रुपयांना विकले जात आहे. उन्हाचे चटके वाढल्याने बहुसंख्य नागरिक नारळपाणी पिण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात शहाळेच्या किमती उंचच उंच चालल्या आहेत. (Nashik increasing heat importance of coconut increased news)

मालेगावसह कसमादे परिसरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे लिंबू शिकंजी, लिंबू, उसाचा रस, सरबत, शीतपेय यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मालेगावचे तापमान राज्यात सध्या आघाडीवर आहे. उन्हापासून बचाव करणाऱ्या पदार्थांना मागणी वाढली आहे, त्यात शहाळेंना सर्वाधिक पसंती असल्याने शहाळ्यांच्या किमती वाढल्या आहेत. चार महिन्यापूर्वी ३० ते ३५ रुपयांना मिळणारे शहाळे सध्या ६० ते ६५ रुपयांना मिळत आहे.

किमतीत थेट दुपटीने वाढ झाली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहाळ्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दर आठवड्याला सुमारे ७० टन शहाळ्यांची विक्री होते. घाऊक बाजारात शहाळे ५० ते ५५ रुपये नगाप्रमाणे मिळत आहेत. भाव वाढल्याने असंख्य हातगाड्या कमी झाल्या आहेत.

शहाळे प्रामुख्याने म्हैसूर, कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात येतात. येथे सुमारे दीडशेपेक्षा अधिक ठिकाणी शहाळ्यांची विक्री होते. दवाखाने, नवीन बसस्थानक, एकात्मता चौक, रावळगावनाका, सटाणा नाका यासह विविध भागात नारळांची विक्री होते.  (latest marathi news)

Professionals selling coconuts in Khadjin area of ​​Malegaon.
Nashik Summer Heat : जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या वेळेत बदल; महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय

शहरातून कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, नांदगाव, मनमाड, येवला आदी भागात शहाळ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे अनेकजण नारळ पाणी पिताना दिसत आहेत. शहाळे महाग असले तरी उन्हाच्या तीव्रतेने त्याचा फटका विक्रीस बसत नाही. यावर्षी मे महिन्यात अजून मागणीत वाढण्याची शक्यता येथील नारळाचे व्यापारी जावेद शेख यांनी सांगितले.

"शहाळे पिल्याने शरीरात इलेक्ट्रोलाईट घटक मिळतात. नारळ पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. शहाळे हे आरोग्यास उत्तम आहे. त्याचे पाणी पिल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलीत राहते. थम्पअप व इतर शीतपेय पिण्यापेक्षा शहाळ्यांचे पाणी प्यावे."

- डॉ. संदीप खैरनार, मालेगाव

"उन्हामुळे ग्रामीण भागातही शहाळ्यांना मागणी वाढली आहे. किमती दुप्पटीने वाढल्या तरी त्याचा फटका विक्रीला बसत नाही. उन्हाळ्यात एक नारळपाणी दोन सलाईनबरोबर असते."

- दानिश बागवान, नारळ विक्रेता, झोडगे

Professionals selling coconuts in Khadjin area of ​​Malegaon.
Nashik News : स्मशानभूमीचा होतोय कायापालट! नामपूरला लोकसहभागातून शेवटचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी धडपड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.