नाशिक : शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी- कर्मचारी रिक्तपदे भरण्यावर आकृतिबंध तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे बंधने आली आहेत. आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या पुढे असेल तर रिक्तपदे भरता येत नाही. परिणामी सरकारी कामात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. महापालिका, वीज वितरण या कार्यालयांमध्ये मानधन पध्दत आहे.
परंतु मानधनावरील कर्मचारी भविष्यात दावा करू शकतो. परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माथी कायमचा शिक्का लागलेला असतो. परंतु कामाची तुलना केल्यास कायम कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतनात अधिक काम केले जाते किंवा करून घेतले जाते. (Nashik Increasing number of contract employees)