पंचवटी : आकृतीबंध बजावणीसह विविध मागण्यांसाठी मोटर वाहन विभागाच्या कार्यालयातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांच्या संघटनेतर्फे बेमुदत बंदला मंगळवार (ता. २४)पासून राज्यभरात सुरुवात झाली आहे. यात नाशिक कार्यालयातील कर्मचारीही सहभागी झाले. यामुळे आरटीओ कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान, कार्यालयात लर्निंग लायसन्स, पक्के लायसन्स आणि वाहन पासिंग करणे आदी कामे सुरू असल्याचे पाहायला मिळाले. (indefinite strike of RTO employees started)
मोटर वाहन विभाग (आरटीओ) राज्य कर्मचारी संघटनेतर्फे आकृतीबंधाची अंमलबजावणी करा, आकृतीबंधानुसार तत्काळ पदोन्नती द्या, सेवा प्रवेशाची तत्काळ अंमलबजावणी करा, समायोजन रद्द करा, महसुली बदल्या रद्द करा, कोळसकर समितीची सुधारित अंमलबजावणी करा, सेवा प्रवेशातील जाचक अटी रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता.
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याबरोबर राज्य कर्मचारी संघटनेची बैठक फिस्कटल्याने अखेर मंगळवारपासून राज्यातील जवळपास ५२ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतील सर्वच कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात नाशिक कार्यालयातील जवळपास ४० ते ४५ कर्मचारी सहभागी झाल्याने आरटीओ कार्यालयाच्या आवारात शुकशुकाट दिसून आला.
आरटीओ कार्यालयात वरिष्ठ अधिकारी व मोटर वाहन निरीक्षक उपस्थित होते. मात्र, मोटर वाहन संघटनेचे सर्वच सदस्य, कर्मचारी संपात सहभागी झाल्याने वाहनांच्या संबंधित असलेले कामकाज बंद असल्याने अनेक काम ठप्प झाले होते. इतर वेळी वाहनांच्या कामकाजासाठी येणारे नागरिक न आल्याने आरटीओ कार्यालय ओस पडल्याचे दिसून आले. (latest marathi news)
या संपात नाशिक मोटर वाहन संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर, कार्याध्यक्ष संतोष नाईक, सचिव शिरीन शहा, भरत चौधरी, अनुप वाघ, शिरीष सोनवणे, भरत संधानशिव, शंकर दिवटे, दत्तात्रय म्हैसधुणे, पंढरीनाथ आडके आदी पदाधिकारी उपस्थित होते; परंतु या वेळी कुठल्याही प्रकारची निदर्शने अथवा आंदोलन केले नाही. या वेळी कार्यालयाच्या आवारात संपाचा फलक लावण्यात आला होता. नागरिकांनी सहकार्य करावे, अशा प्रकारचा फलक प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) लावण्यात आला होता.
निरीक्षकांकडून कामकाज
परवान्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून वेळ आणि तारीख निश्चित करण्यात येते. शिकाऊ परवाना आणि अंतिम परवाना काढण्यासाठी वेळ घेतलेले वाहनचालक आले होते. हेही कामकाज मोटर वाहन निरीक्षक आज करीत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.