Nashik News : इंदिरानगरला 33 केव्ही क्षमतेची भूमिगत लाईन टाकण्यास सुरवात

Nashik News : उपकेंद्र आणि गोविंदनगर उपकेंद्र या उपकेंद्रांना पुरवठा करणारी १३२ केव्ही टाकळी उपकेंद्रापासून कावेरी हॉटेलपर्यंतची लाईन बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले.
work of laying the underground line of 33 KV power supply to the area has started
work of laying the underground line of 33 KV power supply to the area has startedesakal
Updated on

Nashik News : इंदिरानगर परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याप्रकरणी २४ मेस आमदार देवयानी फरांदे यांनी अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना आठ दिवसात इंदिरानगर भागातील केबल बदलण्याच्या कामाला सुरवात करा अन्यथा थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू असा निर्वाणीचा इशारा दिला होता.

त्यानंतर वीज कंपनी आता ॲक्शन मोडमध्ये आली असून सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण करून केबल बदलण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे. ऐन उन्हाळ्यात १३२ केव्ही टाकळी उपकेंद्रापासून कावेरी हॉटेल दरम्यानची लाईन खराब असल्यामुळे २८ तास वीजपुरवठा होऊ शकला नव्हता. त्यामुळे आमदार फरांदे यांनी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात धाव घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

यात टाकळी उपकेंद्रापासून कावेरी हॉटेल दरम्यानची लाईन खराब झाल्यामुळे ही लाईन बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी लागणार असल्यामुळे महावितरणकडून सदर काम करण्यास विलंब होत होता. आमदार फरांदे यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क करून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला होता. (latest marathi news)

work of laying the underground line of 33 KV power supply to the area has started
Nashik News : गोदाघाटावर एका कामावर दुहेरी खर्चाची भीती; सिंहस्थातील कामे ‘नमामि गोदा’ प्रकल्पातून वगळण्याच्या सूचना

तसेच नागरिकांना सुविधा देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सदर काम वेगाने पूर्ण करण्याचे प्रशासनाला सूचित केले होते. त्याअनुषंगाने कंपनीकडून नवीन भूमिगत लाईन टाकण्यासाठी सर्व्हे करण्यात येऊन टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. याबाबतचे सर्व शासकीय सोपस्कार पार पाडून इंदिरानगर, शिवाजीवाडी.

उपकेंद्र आणि गोविंदनगर उपकेंद्र या उपकेंद्रांना पुरवठा करणारी १३२ केव्ही टाकळी उपकेंद्रापासून कावेरी हॉटेलपर्यंतची लाईन बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, दोनच दिवसात सदर काम पूर्णत्वास येणार आहे.

आमदार फरांदे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर कामाला वेग मिळाला असून यामुळे इंदिरानगर परिसरातील विजेचा लपंडाव संपुष्टात येणार आहे. महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सोनवणे आणि सहकारी हे काम युद्धपातळीवर संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घेत आहेत.

work of laying the underground line of 33 KV power supply to the area has started
Nashik News : दुष्काळी मदतीपासून 52 हजार शेतकरी वंचित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.