Nashik News : नऊ वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून प्रभाग क्रमांक ३० आणि ३१ च्या सीमेवर असणाऱ्या नागरे मळा भागात बांधण्यात आलेल्या घरकुल इमारतीमध्ये लाभार्थींची सोडत काढण्यास मनपा प्रशासनाला वेळच न मिळाल्याने ही संपूर्ण इमारत भग्नावस्थेत गेली असून रात्री अपरात्री मद्यपींसाठी हक्काचे ठिकाण म्हणून वापरले जाऊ लागल्याने या इमारतीला आता घरघर लागली आहे. (Nashik News)
२०१४ -१५ साली नागरे मळा परिसरात घरकुल इमारत बांधण्यास सुरवात झाली. या इमारती सोबत वासननगर मधील गामने मैदान समोर आणि नागरे मळा येथे अजून सहा इमारती बांधण्यात आल्या. त्या ठिकाणी पंचवटी, शहीद भगतसिंग वसाहती मधील लाभार्थींना सोडतीद्वारे ताबा देण्यात आला. त्या सर्व इमारतींचा आज वापर होत आहे.
उपरोक्त इमारतीमध्ये तत्कालीन नगरसेवक सतीश सोनवणे यांनी राजीवनगरच्या भगतसिंग वसाहती मधील ८० लाभार्थी येथे पाठवले. याच ठिकाणच्या उर्वरित ४० जणांसाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र अधिकाऱ्यांच्या बघू, करू अशा पवित्रामुळे ते राहून गेले. पंचवार्षिकमध्ये देखील प्रशासनाला जवळपास या घरकुलांची आठवणच पडली.
जे लाभार्थी त्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनाही त्याचे विस्मरण झाले. त्यामुळे आज हा या इमारतीसाठी करण्यात आलेला संपूर्ण खर्च वाया गेला आहे. जवळपास सर्वच सदनिकांच्या खिडक्यांची काचा फुटल्या आहे. शक्य असेल ते लोखंडी सामान चोरट्यांनी पळवून नेले आहे. कुंपण नसल्याने रात्री अपरात्री मद्यपी, नशेडी आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांचा वावर आता सुरू झाला आहे. (latest marathi news)
या भागात गवत वाढल्याने साप आणि विषारी कीटकांचा देखील येथे वावर सुरू झाला आहे. प्रशासनाने किमान एकदा या ठिकाणी भेट देऊन ही इमारत कधीकाळी बांधण्यात आली आहे. याची खातरजमा केली पाहिजे. त्याबाबत आता पुढे काय केले पाहिजे याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
"इमारत बांधून झाल्यानंतर सातत्याने लाभार्थींना ताबा देण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने चालढकल केल्याने लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ही इमारत आज दुरावस्थेपर्यंत पोचली आहे. वेळीच निर्णय घेतले असते तर अनेकांना हक्काचे छत मिळाले असते." - सतीश सोनवणे, माजी नगरसेवक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.