इंदिरानगर/ सिडको : इंदिरानगर बोगदा येथे दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई नाक्याकडून उड्डाणपुलावर चढण्यासाठी असलेला रॅम्प बंद केल्याने ही वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू झाली आहे. त्यामुळे इंदिरानगर ते थेट पांडवलेणीपर्यंत मंगळवारी (ता. ८) सायंकाळी सहापासून मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यात हॉटेल सेवन हेवनजवळ उड्डाणपुलावर जाण्यासाठीचा रॅम्पदेखील बंद केल्याने या कोंडीमध्ये पुन्हा भर पडली. पाथर्डी फाटा चौकातून पायी जाण्यासाठीदेखील अवघड परिस्थिती झाली होती. (Indiranagar Pandavaleni traffic jam)
वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नानंतर संथगतीने का असेना रात्री साडेआठच्या आसपास ही वाहतूक सुरू झाली होती. मात्र त्यानंतर राणेनगर आणि वासननगर भागात दांडियासाठी येणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे पुन्हा एकदा राणेनगर बोगदा भागात कोंडीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.
इंदिरानगर बोगदा ते हॉटेल सेवन हेवनपर्यंत उड्डाणपूल मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बंद झाला. त्यामुळे उर्वरित भागात समोरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीला सुरवात झाली. पाथर्डी फाट्याच्या थोडे अलीकडे उड्डाणपूल मध्यावर पंक्चर करून ही वाहतूक पुन्हा गरवारेकडे मार्गस्थ करण्यात आली. (latest marathi news)
मात्र उड्डाणपुलावर चढण्यासाठी असणारे रॅम्प बंद झाल्याने द्वारका भागातून येणारी सर्व वाहने इंदिरानगर बाजूच्या सर्विस रस्त्याने मार्गस्थ झाल्याने पाथर्डी फाटा चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या त्यामुळे लांब रांगा लागल्या होत्या. हीच परिस्थिती पुढे हॉटेल ताजजवळ असलेल्या बोगदा, हॉटेल एक्स्प्रेस इन पुढे थेट फाळके स्मारक आणि पांडवलेणीपर्यंत होती.
वाहतूक कोंडी दूर करण्यात पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. ही दुरुस्ती आता किती दिवस चालेल आणि नेमके वाहतुकीचे नियोजन कसे होते, याबाबत संबंधितांनी विचार करून नागरिकांना आगाऊ सूचना देण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.