Uday Samant News : नाशिकला डिफेन्सचा मोठा प्रकल्प : उद्योगमंत्री उदय सामंत

Latest Nashik News : उद्योगभरारी कार्यक्रमानिमित्त उद्योगमंत्री सामंत नाशिक येथे आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Uday Samant
Uday Samantesakal
Updated on

सातपूर : आगामी काळात नाशिकमध्ये किमान तीन ते आठ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा डिफेन्स सर्वांत मोठ्या प्रकल्पाचा उद्योग आणण्याचा प्रयत्न अंतिम टप्प्यात आहे. लवकरच संबंधित उद्योजक नाशिकमध्ये येऊनच त्याची घोषणा करतील. राज्यात नागपूर, शिर्डी, कोकण, पुणे, नाशिक डिफेन्स क्लस्टर म्हणून घोषणा केली असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. (Uday Samant statement at udyogbharari program)

उद्योगभरारी कार्यक्रमानिमित्त उद्योगमंत्री सामंत नाशिक येथे आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सामंत म्हणाले, की गेल्या दोन वर्षांत महायुतीच्या शासन काळात डिफेन्स, ज्वेलरी, डायमंड, टेक्सटाईल, कृषी प्रक्रिया उद्योग, लॉजिस्टिक पार्क, लघुउद्योगासाठीची पॉलिसी असे विविध धोरणात्मक निर्णय घेतल्याने आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचा ओढा वाढला आहे. त्यामुळे लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. येणाऱ्या काळात ही संख्या अधिक पटीने वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उद्योगासाठी जागा नसल्याने सातत्याने उद्योग संघटना भूसंपादनाची प्रक्रिया राबवून उद्योग विस्तारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करत होते. त्या दृष्टीने एमआयडीसीने अडीच वर्षांत काम केले आहे.

नाशिकमध्ये नवीन उद्योगासाठी इंडियाबुल्सची साडेबाराशे हेक्टर जमिनीसाठी अंतिम प्रक्रिया सुरू आहे. दिंडोरी (अक्राळे), सिन्नर, विचूर, मालेगाव आदी ठिकाणी शेकडो हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे नवीन उद्योग उभारण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध झाल्याने नाशिकमध्ये दोन मोठे उद्योग येण्यासाठी विचारणा झाली आहे.

त्यातील एक ऑटोमोबाईल, तर दुसरा डिफेन्स क्षेत्रातील आहे. त्यातील डिफेन्स क्षेत्रातील सर्वांत मोठा तीन ते आठ हजार कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून लवकरच याची गूड न्यूज नाशिककरांना देणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. (latest marathi news)

Uday Samant
Nagpur : 200 लाडक्या बहिणींशी ‘अशी ही बनवाबनवी’, स्वयंरोजगाराची कर्जप्रकरणे थंडबस्त्यात, निधी नसल्याचे शासनाचे कारण

‘सकाळ’ची दखल; वीज उपकेंद्र उभारणार

‘सकाळ’ने उद्योगाच्या वीज समस्यांचा विषय मांडला होता. या संदर्भात प्रश्‍न उपस्थित करताच एमआयडीसीसह इतर ठिकाणी वीज उपकेंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून, काही ठिकाणी एमआयडीसीच्या स्वखर्चातून वीज उपकेंद्र उभारले जाईल.

नंतर वीज वितरणकडून त्या खर्चाची वसुली करू, पण उद्योगाचा विस्तार व गुंतवणुकीवर याचा परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याचे या वेळी सामंत यांनी सांगितले. या वेळी ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, शिवसेनेचे विजय करंजकर, अजय बोरस्ते, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.

Uday Samant
Nashik News : दोन वर्षांत 33 हजार नवउद्योजक : उदय सामंत; उद्योग विभागामार्फत 10 हजार 500 कोटींचे अनुदानवाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.