Nashik Civil Hospital : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रामुळे ‘सिव्हिल’वर चौकशीचे ढग

Nashik News : तथाकथित पूजा खेडकर प्रकरणामुळे राज्यसेवेतही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करीत तहसीलदार पदाची नोकरी पदरात पाडून घेणाऱ्या बाळू मरकड याचे कारनामे उघड होत आहेत.
Nashik Civil Hospital
Nashik Civil Hospitalesakal
Updated on

Nashik News : तथाकथित पूजा खेडकर प्रकरणामुळे राज्यसेवेतही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करीत तहसीलदार पदाची नोकरी पदरात पाडून घेणाऱ्या बाळू मरकड याचे कारनामे उघड होत आहेत. तर त्याने दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केल्याने जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी येथून वितरित करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी व चौकशी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (Inquiry on Civil Hospital due to Fake disability certificate)

केंद्रीय लोकसेवा आयोगाला बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करीत आयएएस पद मिळविणाऱ्या तथाकथित पूजा खेडकर प्रकरणाची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे राज्यसेवेच्या २०२२ च्या लागलेल्या निकालातील आठ उमेदवारांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे उघडकीस आले आहे. त्यासंदर्भात चौकशीचे आदेश राज्यसेवा समितीने दिले आहेत.

त्यानुसार जिल्हा रुग्णालयातून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या सोलापूरच्या बाळू मरकड याची पोलखोल झाली आहे. त्याने २०२२ मध्ये संबंधित बोगस प्रमाणपत्र मिळविले असून, यामुळे जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणाची आरोग्य विभागांतर्गत चौकशी होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

त्यामुळे २०२२ मध्ये कार्यरत असलेले तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांसह दिव्यांग प्रमाणपत्रांवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

Nashik Civil Hospital
Nashik News : सशक्त पोषण योजनेच्या पदार्थांची गोडी; 28 हजार 611 विद्यार्थी घेताहेत लाभ

‘ते’ प्रकरणही सध्या बासनात

दोन वर्षांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्हांतर्गत बदल्यांसाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातून बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना अटकही केली होती.

तर काही त्या प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी करणारे वैद्यकीय अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. सध्या हे प्रकरण चौकशीच्या नावाखाली थंड बासनात गेले आहे. परंतु दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पुन्हा बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांचीही चर्चा सुरू झाली आहे.

Nashik Civil Hospital
Nashik Police: शहर पोलीस आयुक्तालयाचा वाहन ताफा झाला ‘तगडा’! पालकमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा; DPDCतून मिळाली 110 वाहने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.