Nashik Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या बॅगमध्ये जीवनावश्यक वस्तू; नाशिकमध्ये निवडणूक आयोगासह भरारी पथकाकडून तपासणी

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आल्यावर त्यांच्या बॅगची तपासणी का केली नाही, असा आरोप झाल्यावर गुरुवारी (ता. १६) निवडणूक आयोगासह भरारी पथकाने त्यांच्या बॅगची तपासणी केली.
The investigation team inspecting Chief Minister Eknath Shinde's bag on Thursday.
The investigation team inspecting Chief Minister Eknath Shinde's bag on Thursday.esakal
Updated on

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आल्यावर त्यांच्या बॅगची तपासणी का केली नाही, असा आरोप झाल्यावर गुरुवारी (ता. १६) निवडणूक आयोगासह भरारी पथकाने त्यांच्या बॅगची तपासणी केली. यात बॅगमध्ये कपडे, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंशिवाय काहीही सापडले नाही. (Inspection of Chief Minister bag by Bharari team along with Election Commission)

महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांआड नाशिकला येत आहेत. गेल्या वेळी मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले, तेव्हा १९ बॅगा भरून पैसे आणल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता.

दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का लागतात, या बॅगांमध्ये नेमकं काय होतं, त्यात ५०० सूट होते की ५०० सफारी, असे प्रश्न राऊत यांनी विचारले होते. (latest marathi news)

The investigation team inspecting Chief Minister Eknath Shinde's bag on Thursday.
Nashik Lok Sabha Constituency : राजाभाऊ वाजे यांचे ‘कुटुंब उतरलंय प्रचारात’

नाशिक येथे झालेल्या जाहीर सभेतही राऊत यांनी १९ बॅगांमध्ये १९ कोटी रुपये असल्याचा उल्लेख केला होता.

गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे नाशिकच्या निलगिरी बाग हेलिपॅडवर आल्यावर निवडणूक आयोगासह पोलिस खात्याच्या अधिकाऱ्यांनी बॅगची तपासणी केली. मात्र, त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

The investigation team inspecting Chief Minister Eknath Shinde's bag on Thursday.
Nashik Lok Sabha Election : परराज्यातील ‘होमगार्ड’ बंदोबस्तासाठी येणार! सेक्टर अधिकाऱ्यांकडून ‘बुथ’वर नजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.