Inspirational Stories : शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी, कृषी शाखेतून पदवी शिक्षण

Inspirational Stories : गावात खडतर परिस्‍थितीत राहून शिक्षण घेताना विनय सुनील पाटील या युवकाने थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यश मिळविले आहे.
 Farmer family
Farmer family esakal
Updated on

शेतात अभ्यास करताना विनयची यशाला गवसणी

Inspirational Stories : गावात खडतर परिस्‍थितीत राहून शिक्षण घेताना विनय सुनील पाटील या युवकाने थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यश मिळविले आहे. शेतकरी कुटुंबातील विनयने कृषी शाखेतूनच पदवी शिक्षण घेतले. तिसऱ्या प्रयत्‍नात तो यूपीएससी परीक्षेत यशस्‍वी झाला आहे. निळवंडी (ता. दिंडोरी) येथील विनयने चौथीपर्यंतचे शिक्षण दिंडोरीला जिल्‍हा परिषद शाळेत घेतले. यानंतर माध्यमिक शिक्षण तालुका पातळीवरील जनता इंग्‍लिश स्‍कूल येथून पूर्ण केले.

पुढे केटीएचएम महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील शिक्षण घेतले; तर के. के. वाघ कृषी महाविद्यालयातून बी. एस्सी (कृषी) शिक्षण पूर्ण केले. या दरम्‍यान २०१७ मध्ये दिंडोरी तालुक्‍यातील यतीश देशमुख यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळविले होते. त्‍यांची प्रेरणा घेत विनयनेही स्‍पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला.

युपीएएसीच्‍या तयारीसाठी त्‍याने दिल्‍ली गाठली; परंतु कोरोनाचा काळ असल्‍याने तो महिना‍भरात स्‍वगृही परतला. शेतीवर अभ्यास करताना त्‍याने तिसऱ्या प्रयत्‍नात यश मिळविले आहे. शेतकरी असलेले वडील सुनील पाटील आणि गृहिणी आई सुचिता पाटील यांचे वेळोवेळी प्रोत्‍साहन मिळाल्‍याने यश मिळविता आल्‍याचे त्‍याने सांगितले.

(nashik Inspirational Stories of Farmer family background )

‘एमपीएससी’त अपयश; पण तिसऱ्या प्रयत्‍नात ‘यूपीएससी’त यशस्‍वी

वेगवेगळ्या स्‍वयंसेवी संस्‍था (एनजीओ) यांच्‍याबरोबर काम करताना निर्माण झालेली सामाजिक कार्याची गोडी... अन्‌ या आवडीतून प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचा विचार शिंगवे (ता. निफाड) येथील आविष्कार विजय डेरले याने नागरी सेवा परीक्षेत यश मिळविताना सत्‍यात उतरविला आहे. विशेष म्हणजे, एमपीएससी परीक्षेत त्‍याला अपयश आले असले तरी तिसऱ्या प्रयत्‍नात यूपीएससी परीक्षेत यशस्‍वी कामगिरी केली आहे.

मूळ शिंगवे (ता. निफाड) येथील आविष्कारने राष्ट्रीय क्रमवारीत ६०४ वा क्रमांक पटकावला. गावाकडील जिल्‍हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण आणि वैतनेय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण त्‍याने घेतले. पुढे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. एस्सी. (भौतिकशास्‍त्र) पदवी शिक्षण पूर्ण केले. वडील विजय डेरले जिल्‍हा परिषद शाळेत शिक्षक, तर आई भारती डेरले या गृहिणी आहेत.

दरम्‍यान, महाविद्यालयात असताना विविध संस्‍थांबरोबर शिक्षण, विज्ञान प्रसारासह पाणीटंचाईच्‍या विषयावर त्‍याने काम केले. प्रशासकीय सेवेत दाखल होण्याची आधीपासूनची आवड असताना, प्रत्‍यक्ष कामकाजादरम्‍यान अधिक वाढत गेली. २०२० पासून स्‍पर्धा परीक्षेच्या ऑनलाइन अभ्यासाला सुरवात केली. यापूर्वी दुसऱ्या प्रयत्‍नात तो मुलाखतीपर्यंत पोहोचला; पण निवड होऊ शकली नाही. एमपीएससीच्‍या राज्‍यसेवा परीक्षेतही दोन वेळा अपयश आले. इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर अखेर त्‍याने तिसऱ्या प्रयत्‍नात यश मिळविले.

अभ्यासाची पद्धत योग्‍य असावी

स्‍पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्‍या चुकांतून शिकावे. आपण किती वेळ अभ्यास करतो, यापेक्षा आपल्‍या अभ्यासाची गुणवत्ता कशी आहे, ही गोष्ट महत्त्‍वाची आहे. स्‍पर्धा परीक्षेत यशस्‍वी होण्यासाठी अभ्यासाची पद्धत योग्‍य असणे आवश्‍यक आहे, असा संदेश आविष्कारने दिला. (latest marathi news)

 Farmer family
Inspirational Story : फिरत्या विक्रेत्या ज्योती भावसार बनल्या उद्योजिका

‘प्रोबेशन’वर असताना तयारी, जान्‍हवीचे दुसऱ्यांदा यश

वडिलांकडून प्रेरणा, पहिले दोन प्रयत्‍न गेले होते वाया

वडिलांना पोलिस दलात कर्तव्‍य बजावताना पाहत जान्‍हवी बाळासाहेब शेखर ही प्रशासकीय क्षेत्रातून समाजसेवा करण्याचे स्‍वप्‍न पाहत लहानाची मोठी झाली. अन्‌ जिद्दीच्‍या जोरावर सहाव्‍या प्रयत्‍नात दुसऱ्यांदा यश मिळविले. यापूर्वी निवड झालेली असताना ‘प्रोबेशन’ कालावधीत दिल्‍लीतील विविध आस्‍थापनांमध्ये कर्तव्‍य बजावत तिने परीक्षेची तयारी सुरू ठेवली. यामुळे क्रमवारीत सुधारणेसह यश मिळविले.

‘यूपीएससी’ची तयारी सुरू केल्‍यावर पहिल्या दोन प्रयत्नांत विविध कारणांनी यश मिळू शकते नव्‍हते. पण, जिद्दीच्‍या जोरावर जान्‍हवीने यशाला गवसणी घातलीच. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांची कन्‍या असलेल्‍या जान्‍हवीचे शालेय शिक्षण फ्रावशी अॅकॅडमी येथून झाले. यानंतर विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेताना पुढे पुण्यातील एमआयटीत सिव्‍हिल शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. यानंतर २०१६ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या तयारीला सुरवात केली.

प्रारंभी थोडे दिवस दिल्‍लीला शिकवणी लावून अभ्यास करताना नंतर पुण्यात घरी राहून स्‍वयंअध्ययन सुरू ठेवले. २०२० च्‍या परीक्षेत राखीव यादीतून निवड होत प्रशासकीय सेवेची संधी मिळाली. प्रशिक्षण पूर्ण केल्‍यावर अंदमान, लक्षद्वीप, दिव-दमण या क्षेत्रासह दिल्‍ली येथील महापालिकेपासून तर सचिवालय अशा विविध आस्‍थापनांमध्ये ‘प्रोबेशन’ कालाधवीत सेवा बजावत आहे. यादरम्‍यान सहाव्‍यांदा परीक्षा देताना यंदा क्रमवारीतील सुधारणेसह तिने यशस्‍वी कामगिरीची नोंद केली आहे.

मोबाईलचा वापर मर्यादित करावा

स्‍पर्धा परीक्षेची तयारी करण्यापूर्वी अभ्यासक्रम नीट वाचायला हवा. प्रत्‍येक मुद्याच्या नोट्‌स काढाव्यात. मागील वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका पाहून सराव करावा. मुख्य परीक्षेसाठी लिखाणाची सवय ठेवावी. मुलखतीसाठी बोलण्याचा सराव करावा. स्‍पर्धा परीक्षांची तयारी करताना सोशल मीडिया, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा, असा संदेश जान्‍हवीने विद्यार्थ्यांना दिला.

 Farmer family
Inspirational Story : गुरू शिष्याची अनोखी कहाणी... ‘त्यांच्या’ अमूल्य पाठबळामुळे शाळाबाह्य 'ती' विद्यार्थिनी बनली वकील!

कोरोनात लोकांचे पाहिले हाल, प्रशासकीय सेवेचा ‘उत्‍सव’चा निर्धार

दहावीपासून घरापासून लांब, आयआयटीतून मिळवली पदवी

कोरोना महामारीत पायपीट करीत स्‍वगृही परतणाऱ्या लोकांच्‍या तांड्याने युवा मनाला हेलावून टाकले. अन्‌ प्रशासकीय सेवेत दाखल होऊन जनतेच्‍या हिताचे कार्य करण्याचा निर्धार युवकाने केला. शिक्षणासाठी दहावीपासूनच घरापासून लांब राहत व ‘आयआयटी’चा पदवीधारक असलेल्‍या उत्‍सव प्रशांत राका याने यूपीएससी परीक्षेत यशस्‍वी होत निर्धार पूर्ण केला आहे. उत्‍सवचे वडील प्रशांत राका यांचा रविवार कारंजावर राका प्रिंटर्स नावाने प्रिटिंगचा व्‍यवसाय आहे.

तसे कुटुंबात कुणी प्रशासकीय सेवेत नाही. मात्र, कोरोना महामारीच्‍या काळातील दृश्‍य पाहून उत्‍सवने प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचा ध्यास बाळगला. अन्‌ कुटुंबातील पहिला अधिकारी होण्याचा बहुमान पटकावला. त्‍याचे दहावीपर्यंतचे शिक्षण अशोका युनिव्‍हर्सल स्‍कूलमधून झाले. यानंतर कोटा (राजस्‍थान) येथून ‘जेईई’च्‍या तयारीला सुरवात केली. पुढे आयआयटी गांधीनगर येथून सिव्‍हील शाखेतून अभियांत्रिकी शिक्षण घेतले.

कौतुकाची बाब म्‍हणजे चार वर्षांचा अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम त्‍याने अवघ्या साडेतीन वर्षांत पूर्ण केला. क्षणाची उसंत न घेता, त्‍याने ‘यूपीएससी’ची तयारी केली. दिल्‍लीला जितो संस्‍थेच्‍या वसतिगृहात वास्‍तव्‍य करताना स्‍वयंअध्ययनातून तयारी सुरू ठेवली. तिसऱ्या प्रयत्‍नात त्‍याने यशाला गवसणी घातली आहे.

तेव्‍हा आला मनात विचार...

अभियांत्रिकी शिक्षणादरम्‍यान महाविद्यालयातील बांधकाम करणारे मजूर गावी परतत होते. त्‍यांना पाहून अस्‍वस्‍थ झालेल्‍या उत्‍सवच्‍या मनात प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचा विचार आला. अन्‌ त्‍याने हेच ध्येय बनवत यशस्‍वी कामगिरी केली. यापुढे आयएएस होण्यासाठी तो प्रयत्‍न सुरू ठेवणार आहे.

 Farmer family
Inspirational Story : चीज पाववड्याने दिली ज्योतीताईंना ओळख

पहिल्‍या प्रयत्‍नात हुकली होती संधी, जिद्दीच्‍या जोरावर सागर यशस्‍वी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या नागरी सेवा परीक्षेत पहिल्‍याच प्रयत्‍नात अवघ्या सात गुणांनी संधी हुकली होती. पण, अपयशाला न जुमानता जिद्दीच्‍या जोरावर सागर संजय भामरे याने तिसऱ्या प्रयत्‍नात यश मिळविले आहे. मूळचा वनोली (ता. बागलाण) येथील सागरचे दहावीपर्यंतचे शिक्षण राहाता (जि. अहमदनगर) येथील डांगे स्‍कूलमधून झाले.

शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार असलेल्‍या सागरने दहावीत शाळेत पहिला क्रमांक पटकावला होता. यानंतर विज्ञान शाखेतून शिक्षण घेताना जी. डी. सावंत महाविद्यालयातून त्‍याने अव्वल क्रमांक पटकावला. पुढे अभियांत्रिकी शिक्षण घेताना पुण्यातील ‘व्‍हीआयटी’मधून ई ॲण्ड टीसी शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले. वडील संजय भामरे शेतकरी, तर आजोबा पंडितराव भामरे हे ‘मविप्र’ शाळेत शिक्षक होते.

दरम्‍यान, २०१९ पासून स्‍पर्धा परीक्षांची तयारी करताना पहिल्‍या प्रयत्‍नात ‘यूपीएससी’त अवघे सात गुण कमी मिळाल्‍याने निवड झाली नव्‍हती. पुढे डिफेन्‍सच्‍या परीक्षेत त्‍याने यश मिळविले; परंतु वैद्यकीय चाचणीत तांत्रिक कारणामुळे अपयश आले. अशा परिस्‍थितीत उमेद न हरता त्‍याने यूपीएससी परीक्षा दिली अन्‌ यशही मिळविले. त्‍याच्या आई रेखा भामरे या गृहिणी असून, बंधू चेतन भामरे खासगी क्षेत्रात नोकरी करीत आहेत.

 Farmer family
Inspirational Story : ‘इपॉक्सी’ फर्निचर निर्मितीने दाखविली ‘प्रकाशवाट’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.