Nashik Inspirational Story : खचलेल्या मनांसाठी ‘आयडॉल’ बनलेल्या सासू-सून

Nashik News : पतीच्या अकाली निधनानंतर सुमनबाईंनी नाशिक रोडच्या भाजी बाजारात फुलांची विक्री सुरू केली. या व्यवसायातून कुटुंबाला सावरणाऱ्या सुमनबाई आणि रूपालीताई यांनी खचलेल्या मनांना उभारी देण्याचा धडाच घालून दिला आहे.
Daughter-in-law Rupali and mother-in-law Sumanbai
Daughter-in-law Rupali and mother-in-law Sumanbaiesakal
Updated on

जगण्याच्या वाटेवर परिस्थिती कशीही असली, तरी त्यातून नक्कीच मार्ग निघतो, या सकारात्मक विचारांवर सासू सुमनबाई अन सून रूपालीताई यांनी प्रयत्न सुरू ठेवले. पतीच्या अकाली निधनानंतर सुमनबाई दोन मुलांचा आधार होत कुटुंबाला सावरत असतानाच काही वर्षांच्या अंतराने नियतीने एका अपघातात मुलाला हिरावून नेले.

कुटुंबावर आलेल्या या परिस्थितीतून सावरतानाच सुनेने दिलेल्या पाठबळावर सासूबाईंनी कुटुंबाची सूत्रे हाती घेतली. पतीच्या अकाली निधनानंतर सुमनबाईंनी नाशिक रोडच्या भाजी बाजारात फुलांची विक्री सुरू केली. या व्यवसायातून कुटुंबाला सावरणाऱ्या सुमनबाई आणि रूपालीताई यांनी खचलेल्या मनांना उभारी देण्याचा धडाच घालून दिला आहे. (Inspirational Story daughter Mother in law from flower business)

नाशिक रोडच्या अरिंगळे मळा येथील माहेर आणि पिंपळद (ता. इगतपुरी) येथील सासर असलेल्या सुमनबाई खंडू जाधव यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतचे (वय ६५). शिक्षण कमी असूनही नेहमीच माहेरच्या संस्कारांचा वसा जपताना नकारात्मक विचारांना सुमनबाई यांनी दूर ठेवले. नाशिक रोडच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात नोकरीला असलेल्या खंडू जाधव यांचे पत्नी सुमनबाई यांच्यासह मुलगा व मुलगी असं चौकोनी कुटुंब होतं.

पुढे मुलाचे लग्न झाल्याने कुटुंबातील सदस्य संख्याही वाढली. मात्र, कदाचित हे नियतीला मान्य नसावं. याच काळात पती खंडू जाधव यांचे आजारपण उद्‍भवले. उपचारांमध्ये कुटुंबावर आर्थिक बोजाही वाढला होता. मात्र, अखेर खंडू जाधव यांचे निधन झाल्याने दुःखाचा डोंगरच कोसळला.

सुमनबाई बनल्या आधार

पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेताना सुमनबाई यांनी मुलगा, सून, नात व नातू यांना आधार देताना उत्पन्नाचे साधन म्हणून नाशिक रोड येथे फुलांचा व्यवसाय सुरू केला. प्रारंभी अरिंगळे मळा परिसरातून फुले आणून सुमनबाईंनी चौकात विक्रीचे दुकान थाटले.

दहा वर्षांपूर्वी या भागातील गरज ओळखून सुरू केलेल्या फुलांच्या विक्रीतून पहिल्याच दिवशी १०० रुपयांची कमाई झाली. सुमनबाई यांना १०० रुपयांपासून मिळालेला आत्मविश्वास मोलाचा ठरला. येथूनच खऱ्या अर्थाने कुटुंबासाठी भक्कम उभे राहता आले. (latest marathi news)

Daughter-in-law Rupali and mother-in-law Sumanbai
Inspirational Story : ‘तिच्या’ चौरंगी यशाने सारेच अचंबित! शैक्षणिक भरारी

एकुलत्या मुलाच्या निधनाचा आघात

मुलगा खासगी कंपनीत नोकरीत असताना सून रूपालीताई या सासू सुमनबाईंना फुलांच्या व्यवसायात मदत करीत होत्या. कुटुंबाचा भार कमी होत आनंदाचे दिवस येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुमनबाई यांच्या एकुलत्या मुलाचे एका अपघातात निधन झाल्याने मात्र त्या खचून गेल्या.

पतीचं छत्र हरपल्यावर अवघ्या पाच वर्षांत मुलाच्या निधनाने त्या सैरभैर झाल्या. समोर सून रूपाली आणि दोन्ही नातवंडे यांची जबाबदारी पेलताना त्यांना आधार देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. नातवंडांच्या भविष्याचा विचार करीत सासू-सुनेने मुलांसाठी उभे राहण्याचा निर्णय घेत दुःखाला दूर सारले.

सासू-सुनेने घालून दिला आदर्श

जाधव कुटुंबावर आलेल्या प्रसंगातून सावरतानाच सासू सुमनबाई आणि सून रूपालीताई यांनी फुलांच्या व्यवसायाकडे लक्ष देत कुटुंबाला सावरले. परिस्थितीमुळे सातवीतच शाळा सुटलेल्या सुमनबाई यांनी दोन्ही नातवंडांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरविले आहे. सुमनबाई आणि रूपालीताई या सासू-सुनांचा रोजचा दिवस सकाळी सुरू होतो आणि रात्री दहाला संपतो.

एकही दिवस फुलांच्या व्यवसायाला सुटी न देता दोघींमधील समन्वयातून समाजासमोर दोन्ही सासू-सुनांनी आदर्श घालून दिलाय. कुटुंबावर आलेल्या संकटात खचून न जाता त्यावर मात करून नक्कीच मार्ग काढता येतो, हेच जणू सासू सुमनबाई व सून रूपालीताई यांनी दाखवून दिलंय. भविष्यातील फुलांची वाढती मागणी लक्षात घेता अगदी तुटपुंज्या भांडवलावरही फुलांचा व्यवसाय सुरू करता येतो, महिलांनी या व्यवसायाकडे संधी म्हणून पाहावे, हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.

Daughter-in-law Rupali and mother-in-law Sumanbai
Inspirational Story : तामसवाडीची कृषिकन्येचा स्पर्धा परिक्षेत डंका! ऋतुजाने सांगळेने पूर्ण केले आई-वडिलांचे स्वप्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.