जन्माला आल्यापासून प्रत्येक दिवस जणू आव्हानं घेऊनच येणारा... माहेरी सुरू झालेला हा संकटांचा प्रवास जणू आयुष्यात कायमचाच सोबत असल्यागत... परिस्थितीमुळे अभ्यासात हुशार असूनही शाळा अर्ध्यावरच सोडावी लागली. आव्हानांना पेलविताना अर्धे आयुष्य संपून गेलं... दोन पैसे हाताशी असावेत, या उद्देशाने माहेर आणि सासरही सुटलं... सुखी संसाराची स्वप्ने रंगवत थेट नाशिकचा रस्ता धरला...
आयुष्याची सेकंड इनिंग सुखकर करीत असताना कोरोनाने वंशाचा दिवा असलेल्या एकुलत्या मुलाला हिरावून नेलं... पतीच्या तुटपुंज्या पगाराला कष्टाचं बळ देत घरगुती पदार्थ विक्रीतून कुटुंबासाठी आधार बनल्या त्या धुळे जिल्ह्यातील नेरच्या रहिवासी व नवीन नाशिकच्या उत्तमनगर भागात राहणाऱ्या लताताई सोनवणे... (Inspirational Story Latabai family supported by vangyache bharit)