Inspirational Story : घरकामाला मदत करून शीतलने मिळविले 92 टक्के

Nashik : धुणी-भांडी करणारी आई ऐन दहावीच्या वर्षी वडीलांचे छत्र हरपले अशा प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या जिद्दीने सामोरे जात बोरगड येथे राहणाऱ्या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९२ टक्के मिळविले आहेत.
Karmaveer AT Pawar Secondary School principal along with teachers congratulations Sheetal.
Karmaveer AT Pawar Secondary School principal along with teachers congratulations Sheetal.esakal
Updated on

Nashik News : धुणी-भांडी करणारी आई ऐन दहावीच्या वर्षी वडीलांचे छत्र हरपले अशा प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या जिद्दीने सामोरे जात बोरगड येथे राहणाऱ्या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९२ टक्के मिळविले आहेत. विशेष म्हणजे अभ्यासाबरोबर आईला घरकामात मदत करून तिने मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

म्हसरूळ येथील कर्मवीर ए. टी. पवार माध्यमिक विद्यालयातील शीतल जिजाबा व्हरकटे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. वडील जिजाबा व्हरकटे, आई मनकर्णा जिजाबा व्हरकटे, चार भावांची एक बहिण असे त्यांचे कुटुंब. वडील जिजा व्हरकटे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात छोटेसे खेडे हनवतखेडा गावातील.

हे कुटुंब घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मूळ गाव सोडून उदरनिर्वाहासाठी नाशिकला आले. ते सुरवातीला आडगाव येथील शिंदे वस्तीत राहू लागले. वडील हाताला मिळेल ते काम तसेच आईही घरकाम, धुणी-भांडी करू लागली. शीतलसह चार भाऊ व बहीण प्राथमिक शिक्षण हे मनपा शाळेत सुरू केले. शीतलने सन २०२२-२३ म्हसरूळ येथील कर्मवीर ए टी पवार माध्यमिक विद्यालयात येथे प्रवेश घेतला.

शीतलचे दहावीचे २०२३-२४ मध्ये शिक्षण सुरू असताना अचानक वडिलांचे छत्र हरविले. या स्थितीत आई व चार भावांनी कुटुंबांची जबाबदारी सांभाळली. घरची प्रतिकूल परिस्थितीची जाणीव असल्याने आई घरकामात मदत करीत, शीतल अभ्यास करत होती. प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता तिने जोमाने व मोठ्या जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. (latest marathi news)

Karmaveer AT Pawar Secondary School principal along with teachers congratulations Sheetal.
Jalgaon SSC Result: दहावीच्या परीक्षेतही मुलीच आघाडीवर! नाशिक विभागात जळगाव जिल्हा तिसऱ्या स्थानी; 94.88 टक्के निकाल

सोमवारी (ता.२७) जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात तब्बल ९२ टक्के मिळाल्याचे पाहून कष्टाचे चीज झाल्याची भावना तिच्यासह तिची आई, चार भाऊ व बहिणीच्या चेहऱ्यावर जाणवत होती. यश संपादन करण्यास आईसह चार भाऊ, बहीण व वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले होते.

यांचे लाभले मार्गदर्शन

सर्व शिक्षकांनी आमची पुरेपूर तयारी करून घेतली. आमच्या शाळेतील मुख्याध्यापक के. के. काळेसर, ज्येष्ठ शिक्षिका एस. पी. जाधव, वर्ग शिक्षक ए. सी. अंधारे, आवारे, थेटे, एन एस जाधव, सोनवणे, गवळी या सर्वांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे शीतलने ‘सकाळ’ ला सांगितले.

Karmaveer AT Pawar Secondary School principal along with teachers congratulations Sheetal.
HSC SSC Exam Result : आईचे बारावीत, तर लेकाचे दहावीत यश; नोकरी सांभाळत १८ वर्षांनंतर दिली परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.