Inspirational Story : शिकण्याची धडपड, सुरज पायाने लिहितोय पेपर..! YCMOU च्या सोलापूर जिल्‍ह्यातील केंद्रावर देतोय परीक्षा

Nashik News : सध्या सुरु असलेल्‍या परीक्षांना तो सामोरे जात असून, सोलापूर जिल्‍ह्यातील परीक्षा केंद्रावर बसून पायाने पेपर लिहितांना त्‍याने सर्वांकडून कौतुकाची थाप मिळविली आहे.
Suraj Mujawar while writing on the answer sheet with feet in the written examination of Yashwantrao Chavan Maharashtra Open University.
Suraj Mujawar while writing on the answer sheet with feet in the written examination of Yashwantrao Chavan Maharashtra Open University. esakal
Updated on

नाशिक : जन्‍मजात अपंगत्‍व आलेले असले तरी, शिक्षणाच्‍या आवडीतील हा अडथळा न ठरु देता सुरज शब्‍बीर मुजावर या युवकाने आपली कौशल्‍ये वृद्धींगत केली आहे. यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातून तो शिक्षण घेत आहे. सध्या सुरु असलेल्‍या परीक्षांना तो सामोरे जात असून, सोलापूर जिल्‍ह्‍यातील परीक्षा केंद्रावर बसून पायाने पेपर लिहितांना त्‍याने सर्वांकडून कौतुकाची थाप मिळविली आहे. (Nashik Inspirational Story Struggling to learn Suraj mujawar YCMOU Exam)

मनात जिद्द असेल तर कठीण कार्यदेखील लिलया पूर्ण होते, याचीच प्रचिती आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पानीव (ता.माळशिरस, जि.सोलापूर) येथील श्रीराम शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय या अभ्यासकेंद्रावर प्रथम वर्ष कला शाखेस प्रवेश घेतलेला सुरज शब्बीर मुजावर हा जन्मजात दिव्‍यांग आहे.

त्यास दोन्ही हात नाहीत. परंतू त्याच्यात शिक्षणाची आवड, प्रचंड मेहनत आणि जिद्द असल्यामुळे बारावीचे शिक्षण घेऊन त्याने पुढे मुक्त विद्यापीठाच्या बीए शिक्षणक्रमास प्रवेश घेतला आहे व सध्या तो उन्‍हाळी सत्र परीक्षेला सामोरे जात असतांना आपल्‍या पायाने उत्तरपत्रिकेवर लिखान करतांना आपले उज्‍ज्‍वल भवितव्‍यदेखील रेखाटतो आहे. (latest marathi news)

Suraj Mujawar while writing on the answer sheet with feet in the written examination of Yashwantrao Chavan Maharashtra Open University.
Inspirational Story : चाकरमान्यांच्या वसाहतीतील आधारस्तंभ बेबाबाई गढरी

सुरजचे पालक शेतकरी असून, घरची परिस्थिती बेताचीच आहे. या विद्यार्थ्यास दोन्ही हात नसतांनाही परीस्‍थितीवर मात करून तो आपल्या पायाने पेपर लिहून परीक्षा देत आहे. त्‍याच्‍या इच्छाशक्तीचे कौतुक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, कुलसचिव दिलीप भरड यांनी केले आहे.

Suraj Mujawar while writing on the answer sheet with feet in the written examination of Yashwantrao Chavan Maharashtra Open University.
Inspirational Story : अपघाताने दगा, पण इच्छाशक्तिने गाठले यशोशिखर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.