NMC News : पाणीपुरवठा सुरळीत करा, तक्रारी नको! आयुक्तांकडून जागेवर तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना

NMC News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असला तरी प्रत्यक्षात नियोजनात त्रुटी निर्माण झाल्याने शहराच्या अनेक भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
Nashik NMC
Nashik NMCesakal
Updated on

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असला तरी प्रत्यक्षात नियोजनात त्रुटी निर्माण झाल्याने शहराच्या अनेक भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. जेथे सुरळीत पाणीपुरवठा आहे, तेथे गढूळ पाण्याच्या तक्रारीत येत आहेत. भरपावसात नागरिक महापालिकेवर मोर्चे काढत असल्याने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दखल घेत अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. (Instructions for disposal of grievances on spot by Commissioner for problem of water )

नागरिक निवेदन घेऊन येतात त्यापेक्षा फिल्डवर जाऊन अभियंता पाण्याच्या तक्रारींची निराकरण करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या. यंदा जोरदार पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे हे तीनही धरणे भरली आहेत. त्यामुळे या वर्षात पाण्याची चिंता नाही, परंतु पावसाळ्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नाशिक महापालिकेवर तब्बल सहा नागरिकांनी मोर्चे व निवेदन देऊन प्रशासनाला धारेवर धरले. सर्वात मोठा मोर्चा प्रभाग क्रमांक २८ मधील महिलांनी काढला. महापालिका मुख्यालयाच्या आवारात सहा बस भरून आलेल्या महिलांनी मुख्यालयासमोर तीन तास ठिय्या दिला. आयुक्त करंजकर यांनी आंदोलनाची दखल घेत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या.

शहरांमध्ये अनेक भागात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अनेक भागात पाणीपुरवठा कमी दाबाने व सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी येत आहे. नागरिकांची निवेदनेदेखील आहेत. विभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अपुरा पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी भेट देऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. (latest marathi news)

Nashik NMC
Nashik NMC News : कर कपातीचा प्रस्ताव! निवडणुकीच्या तोंडावर मनपा प्रशासनावर दबाव

दिवाळीत दोनदा कचरा संकलन

दीपावलीनिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे दररोज तेथील परिसर स्वच्छ ठेवणे व साफसफाई करणे गरजेचे असून, दोन वेळा कचरा संकलन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील व फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून पादचारी मार्ग मोकळा करावा. विभागीय अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातील नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

साथरोग आटोक्यात आणा

पावसाळा संपल्याने वातावरणात बदल होत आहे, तर डासांचे प्रमाणदेखील वाढण्याची शक्यता आहे. पाऊस संपल्याने घराच्या बाहेर व आतमध्ये अडगळीच्या ठिकाणी स्वच्छ पाण्यात डेंगी अळ्या उत्पत्ती होतात. वैद्यकीय विभागाने सर्व विभागांमध्ये पथक नियुक्त करून दररोज पाहणी करावी. त्याप्रमाणे डेंगी उत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करण्याच्या व साथरोग आटोक्यात आणाव्या. शहरात नियमित धूर फवारणी सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या.

नदीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

गोदावरी व नंदिनी तसेच उपनद्यांवरील पुलावर कचरा टाकू नये, यासाठी संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत. मात्र त्यानंतरदेखील निर्माल्य तसेच बांधकामाचे डेब्रिज नदीत टाकले जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकचा वापरदेखील वाढला असून नदीच्या किनारी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आढळून येत आहेत. डेब्रिज उचलण्याबरोबरच नदी परिसरात अस्वच्छता असलेल्या भागात सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या.

Nashik NMC
Nashik NMC News : निवडणुकीच्या तोंडावर शहरात ‘होर्डिंग्ज वॉर’! महापालिकेचे दुर्लक्ष; ‘आय साइट’ नसल्याने अपघाताची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.