Nashik News : केंद्र सरकारने देवू केलेला ‘नमामि गोदा’ प्रकल्प कागदावरच अवतरतं असला तरी सिंहस्थाच्या निमित्ताने शासनाकडून प्राप्त होणारा निधी व प्रकल्पाचा निधी एकाच कामावर दोनदा खर्च होवू नये म्हणून सिंहस्थ व नमामि गोदा प्रकल्पाची स्वतंत्र कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘नमामि गोदा’ प्रकल्पावर काम करणाऱ्या संस्थेलादेखील सिंहस्थ आराखड्यात तरतूद करण्यात आलेल्या कामांचा समावेश वगळण्याची सूचना करण्यात आली आहे. (Instructions for exclusion of works at Simhastha kumbh mela from Namami Goda project)
वाराणसी येथे गंगा नदीवर नमामि गंगा प्रकल्प राबविण्यात आला. त्यात नदी स्वच्छतेबरोबरचं सौंदर्यीकरण करण्यात आले. त्याचं धर्तीवर नाशिकच्या गोदावरी नदीचे रुपडे पालटण्यासाठी नमामि गोदा प्रकल्प अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२१ मध्ये तत्कालीन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी प्रकल्पाला तोंडी मान्यता दिली.
महापालिकेला पत्र पाठवून प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. ऑगस्ट २०२१ मध्ये नमामि गोदा प्रकल्पासाठी केंद्राकडून सूचना आल्या. परंतु अद्यापही सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झालेला नाही. दरम्यान प्रकल्पाचा अहवाल तयार करताना सिंहस्थ विकास आराखड्यात महापालिकेने धरलेली कामे वगळली जाणार आहे.
एकाच कामावर दोनदा खर्च परवडणारा नसल्याने प्रकल्पाचा आराखडा तयार करणाऱ्या संस्थेला सिंहस्थ आराखड्याची कामे वगळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा ज्या जागेत साजरा केला जातो, त्या गोदाघाट परिसरातील सौंदर्यीकरणा व्यतिरिक्त अन्य कामे महापालिका करणार आहे. (latest marathi news)
त्या व्यतिरिक्त प्रकल्पात सोमेश्वर येथे रोप-वे बसविणे, नदीपात्रात बोट चालविणे, गोदावरीच्या उजव्या तीरावर समांतर मलवाहिका, नवशा गणपती येथे घाट विकसित करणे, पार्किंग सुविधा तसेच पर्यटकांना सुविधा, सोमेश्वर घाटाची पुनर्बांधणी, सोमेश्वर धबधबा येथे आधुनिक पद्धतीचे रेलिंग, धबधबा ते सोमेश्वर मंदिर दरम्यान प्रस्तावित रोप-वे, नवीन पूल बांधण्याबरोबरच लेझर शोचे देखील नियोजन आदी कामांचा समावेश आहे.
नमामि गोदा प्रकल्पात महत्त्वाचे
- गोदावरीबरोबरचं नंदिनी, वालदेवी, वाघाडी व कपिला या उपनद्यांचाही विकास.
- उपनद्यांमध्ये मिसळणारे ड्रेनेजचे नाले बंद करून गॅबियन वॉल बांधणे.
- नदीत मिसळणारे गटारींचे पाणी थांबविणार.
- जुन्या गटारींची दुरुस्ती.
- मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण व क्षमतावाढ, सांडपाण्याचा पुनर्वापर.
- गोदाघाट विकास व सौदर्यीकरण.
- गोदापार्क व रिलायन्स पार्कचे पुनर्निर्माण करणे.
- गोदापार्क परिसरात ग्रीन बेल्ट तयार करणे.
सिंहस्थ आराखड्यातील कामे
- सतरा हजार कोटींच्या वर आराखडा.
- महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे मिसिंग लिंक विकसित करणे.
- अठरा ठिकाणी पार्किंग विकसित करणे.
- शहरातील ३५० किलोमीटर लांबीचे रस्ते
- तपोवनात साधुग्रामसाठी ७०० एकर जागा
- अंतर्गत व बाह्य वाहनतळांचा विकास
- शहरात येणाऱ्या वाहनांच्या संख्येनुसार रस्त्यांचे नियोजन
- मलनिस्सारण केंद्र, जलशुद्धीकरण केंद्र, रुग्णालये, पोलिस ठाणे, मंदिरे आदी.
"सिंहस्थ आराखड्यातील कामे व नमामि गोदा प्रकल्पातील कामांवर दोनदा खर्च होवू नये यासाठी सिंहस्थ आराखड्यातील कामे वगळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत." - संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.