Nashik News : विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्याने त्याअनुषंगाने आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र आचारसंहितेच्या कालावधीमध्ये महत्त्वाची कामे रखडल्याने नाशिक महापालिकेला अत्यावश्यक कामांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Instructions for sending proposal for essential work to State Govt)
लोकसभा निवडणुकीची घोषणा १६ मार्चला करण्यात आली. तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या विकासकामांना ब्रेक लागला होता. याच दरम्यान शिक्षक मतदारसंघाची निवडणूकदेखील जाहीर करण्यात आली. मात्र निवडणूक आयोगानेच प्राप्त तक्रारीनुसार निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
५ जूनला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली. मात्र पुन्हा शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता सुरू झाली. ६ जुलैपर्यंत ही आचारसंहिता राहणार आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेचे अनेक काम आचारसंहितेत सापडले आहे. पुढील चार महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका लागतील.
त्यामुळे या वर्षी नाशिक महापालिकेला कुठलीच कामे करता येणार नाही. आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विकासकामे करता येत नसल्याने महापालिकेकडून नगर विकास विभागामार्फत मुख्य सचिवांकडे महत्त्वाच्या कामांची यादी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. (latest marati news)
मुख्य सचिवांनी महत्त्वाच्या कामांना हिरवा कंदील दाखविल्यास कामे मार्गे लागतील. महत्त्वाची विकासकामे मार्गी लावण्यासाठी महापालिकेकडून एकत्रित कामांची यादी नगर विकास विभागामार्फत मुख्य सचिवांना पाठविले जाणार आहे. महत्त्वाच्या प्रस्तावांची माहिती एकत्रित केली जाणार असून लवकरच ती शासनाला सादर केली जाईल.
या कामांना लागला ब्रेक
गंगापूर धरणातून चर खोदण्याचा प्रस्ताव, थेट जलवाहिनी योजना, दारणा धरण थेट जलवाहिनी योजना, सिटीलिंक वाहक पुरवठादार कामाची मुदतवाढ, मलनिस्सारण केंद्राचे आधुनिकीकरण, वैद्यकीय व अग्निशमन कर्मचारी भरती प्रक्रिया, पेस्ट कंट्रोल निविदा प्रक्रिया ही कामे आचारसंहितेमुळे रखडली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.