International Women's Day 2024: महिलांनी शारीरिक समतोल जोपासणे गरजेचे : डॉ. अनिता बांगर

Health News : भारतीय महिलांच्या जीवनशैलीत स्वतःपेक्षा तिला कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागते
PCOD
PCODesakal
Updated on

"एक निरोगी स्त्री ही ‘आनंदी स्त्री’ आहे, असे म्हटले जाते. परंतु महिला आपल्या शारीरिक परिवर्तनाकडे लक्ष देतात का? हा खरा प्रश्न आहे. यासाठीच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी शारीरिक समतोल जोपासण्याचा निश्चय करण्याची गरज आहे."

- डॉ. अनिता बांगर, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारणतज्ज्ञ, डॉ. बांगर स्पर्श वूमन्स हॉस्पिटल

(nashik International Womens Day 2024 Dr Anita Bangar marathi news)

आयुष्यभर स्त्रीच्या शरीरात प्रचंड बदल घडतात. आपण जगण्यात इतके व्यस्त होतो, की आरोग्याकडे अजिबातच लक्ष देत नाही. भारतीय महिलांच्या जीवनशैलीत स्वतःपेक्षा तिला कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागते. शक्यतो आहार हा साधा व संतुलित असावा. कोणतेही केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह रंग, वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेट फूड, अजिनोमोटो टाळले पाहिजे.

तळलेले पदार्थ आणि मीठ यांचे सेवन कमी करा. बेकरी पदार्थांमध्ये वापरला जाणारा ‘मार्गरिन’ हा घटक हृदयासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे बेकरी पदार्थ टाळावेत. आठवड्यातून किमान चार ते पाच दिवस व्यायाम करा. कोलेस्ट्रॉल नियंत्रण, रक्तदाब निरीक्षण, तणाव, मधुमेह व्यवस्थापन, आहार नियंत्रण केल्यास आरोग्य उत्तम राहील, तसेच नियमित आरोग्य तपासणी करणेही तितकेच गरजेचे आहे.

पीसीओडी म्हणजे काय?

पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, ही महिलांमध्ये उद्‍भवणारी मासिक पाळीशी संबंधित स्थिती आहे. ज्यामध्ये परिपक्व स्त्रीबीजांच निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते. पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, ही महिलांमध्ये उद्‍भवणारी मासिक पाळीशी संबंधित स्थिती आहे. ज्यामध्ये परिपक्व स्त्रीबीजांच निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते. (Latest Marathi News)

PCOD
International Women's Day : महिलांनी उद्योग, व्यवसाय, नोकरीसह सर्वच क्षेत्रांत गाठलं शिखर

पीसीओडीची लक्षणं काय आहेत?

- मासिक पाळीच्या समस्या

- वंध्यत्व

- शरीरावर अतिरिक्त केस

- वजन वाढणे

- ओटीपोटात वेदना

‘पीसीओडी’ची कारणे

‘पीसीओडी’ची समस्या जरी सामान्य असली तरी प्रत्येक स्त्रीमध्ये त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे की,

1. इन्शुलिनचे वाढते प्रमाण

2. जीन्स (Genes): पीसीओडी आनुवंशिक आहे. अनेक वेळा महिलांना आनुवंशिकरीत्या पीसीओडीची समस्या असू शकते. इतर कारण जसे:

- अस्वस्थ जीवनशैली

- निष्क्रिय जीवनशैली

- अयोग्य आहार

- ‘पीरिअड्स’मध्ये असंतुलन असणे

- शरीरात इन्शुलिनची जास्त मात्रा (Latest Marathi News)

PCOD
International Women's Day : महिलेच्या हाती व्यवसायाची दोरी; आगरी लस्सीचा ब्रँड केला विकसित

‘पीसीओडी’ कोणाला आणि कधी होतो?

‘पीसीओडी’ची समस्या ही पूर्वी ३० ते ३५ वयोगटांतील महिलांमध्ये दिसून येत होती. पण आता ही समस्या झपाट्याने वाढत आहे आणि १८ ते २० वयोगटांतील मुलींमध्येसुद्धा ‘पीसीओडी’च्या समस्येचे लक्षणं दिसून येतात. याच कारण मुख्यतः जीवनशैलीतले बदल आणि वाढत्या हार्मोनल समस्या आहे. आजच्या काळात पाच ते दहा महिलांमध्ये पीसीओडीची समस्या आढळते. मुख्यतः तेव्हा, जेव्हा स्त्रिया गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात.

‘पीसीओडी’ गर्भधारणा राहू शकते का?

‘पीसीओडी’ असलेल्या प्रत्येक स्त्रीला गर्भधारणेत अडचण येत नाही. सोबतच ॲडव्हान्स फर्टिलिटी ट्रीटमेंट जसे ‘आयव्हीएफ’च्या मदतीने स्वस्थ गर्भधारणा शक्य आहे.

पीसीओडीपासून कसे वाचावे

- उच्च कोलेस्टेरॉल, फॅट आणि कार्बोहाइड्रेट टाळणे

- नियमितपणे व्यायाम करणे

- वेळेवर औषधे घेणे

- वजन नियंत्रित करणे

- अधिक तेलकट आणि मसालेदार गोष्टी टाळणे

PCOD
International Women's Day 2024 : अन्नप्रक्रिया उद्योजिका घडविणारी ‘मसाला क्वीन’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.