International Yoga Day 2024
International Yoga Day 2024esakal

International Yoga Day 2024 : योगशास्त्राचे 6 हजार परदेशी विद्यार्थ्यांनी गिरविले धडे

Yoga Day : योग ही भारताने जगाला दिलेली अद्भुत देणगी असून, २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ जगभरात साजरा होतो.
Published on

International Yoga Day 2024 : योग ही भारताने जगाला दिलेली अद्भुत देणगी असून, २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ जगभरात साजरा होतो. त्र्यंबकेश्वर येथील योग विद्या गुरुकुलमधून सहा हजार परदेशी विद्यार्थ्यांनी योगशास्त्राचे शिक्षण घेऊन परदेशात स्वतःचे योगा सेंटर सुरू केले आहे, तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २००६ पासून योगशास्त्र अभ्यासक्रम शिकविला जातो. (6 thousand foreign students took yoga lessons )

राज्यभरातून मुक्त विद्यापीठाच्या योगविषयक शिक्षणक्रमातून १५ हजार योगशिक्षक तयार झाले आहेत. परदेशी नागरिकांना योगाविषयी बरेच आकर्षण असल्याने परदेशात योगा शिकण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. वजन कमी करणे वा वाढविण्यासाठी, चेहऱ्याच्या ठेवणसाठी फेस योगा, सुंदर दिसण्यासाठी परदेशी नागरिक योगा शिकण्याला विशेष प्राधान्य देतात.

जिथे विज्ञान तंत्रज्ञान कमी पडते, तिथे पारंपरिक आयुर्वेद, योगाभ्यास उपयोगी पडतात. जी आजारपण दूर करण्यात विज्ञान, तंत्रज्ञान, डॉक्टर अयशस्वी ठरतात, तिथे योगशास्त्राने रुग्ण बरे केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे भविष्यात योगशास्त्राकडे संधी म्हणून बघताना परदेशी भाषा आणि योगाशास्त्राचे धडे घेतल्यास भारताबाहेर करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. (latest marathi news)

International Yoga Day 2024
International Yoga Day 2024 : मनोभावे करा योग, दूर पळतील सर्व रोग, प्रियजनांना द्या योग दिनाच्या शुभेच्छा

२१ जून निवडण्यामागे कारण काय?

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी २१ जून तारीख निवडण्यामागे विशेष कारण आहे. २१ जून हा वर्षार्षातील सर्वांत मोठा दिवस मानला जातो, त्याला ‘उन्हाळी संक्रांत असे म्हणतात. उन्हाळी संक्रांत हा उत्तर गोलार्धातील सर्वांत जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. २१ जूननंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खास मानला जातो. त्यामुळे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

''दर वर्षी तीन ते चार हजार विद्यार्थी योगशिक्षक डिप्लोमाला प्रवेश घेतात. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांनी जगभरात योगाचा प्रसार केल्यामुळे खासकरून युरोपीय देशांमध्ये त्यात जर्मनीमध्ये योगा इन्स्टिट्यूट सर्वाधिक आहेत. मुक्त विद्यापीठात हिंदी, इंग्रजी, मराठी योगशास्त्राचा अभ्यासक्रम शिकविला जातो. भविष्यात इतर परदेशी भाषांमध्ये हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे.''- डॉ. जयदीप निकम, आरोग्य शिक्षण शाखेचे संचालक, मुक्त विद्यापीठ

''योगामध्ये करिअर करण्यासाठी सझ्या खूप चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ याशिवाय सरकारी नोकरी मिळत असल्याने वर्षाला हजार शिक्षक गुरुकुलमधून बाहेर पडतात.''-विश्वास मंडलिक, योगाचार्य, योग विद्या गुरुकुल

International Yoga Day 2024
International Yoga Day 2024 : योग हा जागतिक परंपरेचा एक भाग ! पण तो जगाच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.