International Yoga Day : मालेगावात योगदिन उत्साहात साजरा; विविध कार्यक्रमांची रेलचेल

Nashik News : शहर व परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिकांसह विविध कार्यक्रम झाले.
Servant and seekers doing yoga on the grounds of Massage College in Malegaon
Servant and seekers doing yoga on the grounds of Massage College in Malegaonesakal
Updated on

मालेगाव : शहर व परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिकांसह विविध कार्यक्रम झाले. येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संचालित आरोग्य संपदा संगीतमय योगा परिवाराच्या माध्यमातून मसगा महाविद्यालयाच्या मैदानावर महायोगाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (International Yoga Day celebrated with enthusiasm in Malegaon)

प्रजापिता ब्रम्हाकुमारी सेंटरच्या मुख्य संचालिका राजयोगिनी शकुंतला दिदी, राजयोगिनी उज्वला दिदी व बऱ्हाणपूर येथील कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या राजयोगिनी जयश्री दिदी, डॉ. मल्हार देशपांडे, काशिनाथ कापडणीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

राजयोगिनी जयश्री दिदी, शकुंतला दिदी व उज्वला दिदी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. मल्हार देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अर्चना देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ योगसेवक व मार्गदर्शक योगेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शहरातील सर्व योगा मैदानांवरील योगसेवक व योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामान्य रूग्णालयात योगा डे

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त येथील सामान्य रुग्णालय मालेगाव व नर्सिंग महाविद्यालयातर्फे योगा डे साजरा करण्यात आला. येथे उपस्थित डॉक्टर व परिचारिका यांनी योग वर्ग घेतला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लक्षण चव्हाण यांनी योगा करण्याचे फायदे सांगितले. शिबिरासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण, रेखा माळी, डॉ. संदिप खैरनार, भामरे व विद्यार्थी उपस्थित होते. (latest marathi news)

Servant and seekers doing yoga on the grounds of Massage College in Malegaon
International Yoga Day 2024 : योग बनला खेळ; भारतीय योगासाठी किती बदलले अरब देश?

जयहिंद इंग्लिश मिडीयम स्कूल

दाभाडी (ता. मालेगाव) येथील जयहिंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये योगदिन सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना योगा दिनाबद्दलचे महत्व सांगण्यात आले. योग आपल्याला प्राणायाम आणि ध्यानाद्वारे आत्म-नियंत्रण, संयम आणि सकारात्मक विचार विकसित करण्यास मदत करतो.

योग आपली एकाग्रता वाढवते आणि आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व खूप मोठे आहे. योग आपल्याला आत्मा शोधण्यात मदत करतो आणि आपली आंतरिक शांती आणि समतोल साधण्यास मदत करतो. शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनी प्राणायाम, सूर्यनमस्कार व विविध आसने केली.

प्राचार्य नंदन, अजय खैरनार, क्रीडा शिक्षक तुषार शेवाळे, प्रवीण पवार यांनी योगासन करून दाखवले. उपप्राचार्य पंकज अहिरे, पर्यवेक्षक जयश्री हिरे, दीपक अहिरे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Servant and seekers doing yoga on the grounds of Massage College in Malegaon
International Yoga Day : योग जीवनातील स्वास्थ्याचे प्रमुख अंग : जिल्हाधिकारी शर्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.