International Yoga Day : योग जीवनातील स्वास्थ्याचे प्रमुख अंग : जिल्हाधिकारी शर्मा

Nashik News : योग हे स्वास्थ्याचे प्रमुख अंग असून त्याच्या नियमित सरावाने शारीरिक, मानसिक स्वास्थ्याबरोबरच सार्वजनिक स्वास्थ्यही जपले जाते, असे मत जिल्ह्याधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
Meenatai Thackeray Hall Collector Jalaj Sharma attended the International Yoga Day programme
Meenatai Thackeray Hall Collector Jalaj Sharma attended the International Yoga Day programme esakal
Updated on

Nashik News : नियमित योग, ध्यानधारणा, प्राणायाम केल्यास माणसाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य दीर्घकाळ टिकून राहाते. योग हे स्वास्थ्याचे प्रमुख अंग असून त्याच्या नियमित सरावाने शारीरिक, मानसिक स्वास्थ्याबरोबरच सार्वजनिक स्वास्थ्यही जपले जाते, असे मत जिल्ह्याधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवारी (ता. २१) व्यक्त केले. (International Yoga Day Collector Sharma statement Yoga is an important part of health in life)

जागतिक योग दिनाचे औचित्य साधत सुयश हॉस्पिटल, संग गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट, एम्पायर स्पायसेस ॲन्ड फूड्स व भारत विकास परिषद यांच्यातर्फे शहराच्या वेगवेगळ्या विभागात योग, प्राणायाम व ध्यानधारणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात ज्येष्ठांसह तरुणांनीही योगाचे धडे गिरवीत निरामय जीवनशैलीबाबत उत्सुकता दाखवत योगाचे धडे गिरविले.

जनमानसात लोकप्रिय असलेले राज्यातील अग्रगण्य ‘सकाळ’ उपक्रमाचे मीडिया पार्टनर होते. जागतिक योग दिनाचे औचित्य साधत सकाळी पंचवटीतील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडिअमवर या उपक्रमाचा समारोप झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी शर्मा यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सपत्निक सहभागही नोंदविला.

योगसाधना ही प्रासंगिक नव्हे तर नियमित जीवनशैली असल्याचा अभिप्रायही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी नोंदविला. उपक्रमात शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, स्काऊट गाइड विद्यार्थी, खासगी आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचारी अशा अनेकांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, डॉ. सुनील ओस्तवाल, क्रिडा अधिकारी महेश पाटील. (latest marathi news)

Meenatai Thackeray Hall Collector Jalaj Sharma attended the International Yoga Day programme
International Yoga Day : सदर्न कमांड आणि अय्यंगार योग'

भाजप नेते सुनील केदार, गिरीश पालवे, रुचिता विश्‍वास, डॉ. योगेश कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, गीता कुलकर्णी, भारती, पाटील, डॉ. प्रीती त्रिवेदी, संगू गुरुजी यांच्यासह योग शिक्षक, साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरोगी व आनंदी जीवनशैलीसाठी वरदान ठरणाऱ्या योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे शहरात प्रथमच आयोजन करण्यात आल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी नोंदविली.

सकाळ, रेडिओ विश्‍वासच्या माध्यमातून या शिबिराद्वारे हजारो लोकांपर्यंत पोचल्याचे समाधान आयोजक समितीचे डॉ. सुनील ओस्तवाल यांनी व्यक्त केले. हजारो लोकांनी भर उन्हात याबाबत दाखविलेला उत्साह कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

निरामय आरोग्यासाठी अन्य, पर्याय नाही : डॉ. ओस्तवाल

माणसाची जीवनात आनंदी व निरोगी राहणे, ही सर्वात मोठी इच्छा असते. खरेतर या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या तंदुरुस्त व निरामय आरोग्याच्या वाटेवर जाण्यासाठी योगसाधनेसारखा अन्य पर्याय नाही, असे मत या उपक्रमाचे प्रमुख पुरस्कर्ते व सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील ओस्तवाल यांनी नोंदविले.

Meenatai Thackeray Hall Collector Jalaj Sharma attended the International Yoga Day programme
International Yoga Day 2024 : ..'म्हणून आयुष्यात योगा हा माझ्या जगण्याचा एक भाग झाला'; अमृता खानविलकरने योग दिनानिमित्त दिल्या खास टिप्स !

योगसाधना, ध्यानधारणेसाठी आपल्याकडे अतिशय सुंदर, अनुकूल वातावरण असल्याने प्रत्येकाने निरोगी वाटेकडे नेणाऱ्या या जीवनशैलीचा अंगीकार करावा, अशी प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली.

"गत तीस वर्षांपासून महाराष्ट व कर्नाटक राज्यात योगसाधनेचा प्रसार करत आहे. साधकांच्या जीवनातील आनंद टिकून राहण्यात योगाची भुमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. या योगसाधनेद्वारे शरीर व मनाचे ख-या अर्थाने एकत्रीकरण होते, त्यामुळे मानवी जीवनात तो आवश्‍यक आहे." - योगाचार्य संगू गुरूजी, नाशिक

"योग हा उत्तम जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. ज्याद्वारे व्यक्तीच्या स्वाभिमान, आत्मविश्‍वास, उत्कटता प्रज्वलित व सशक्त करण्याचा हा सोपा मार्ग आहे. योग जागरुकता व चेतनेची वाढ घडवून आणतो, जेणेकरून स्वतःला निसर्गाच्या तत्वांशी संरेखित करता येईल." - डॉ. प्रिती त्रिवेदी, नाशिक

Meenatai Thackeray Hall Collector Jalaj Sharma attended the International Yoga Day programme
International Yoga Day : जगाच्या कल्याणासाठी योग प्रभावी माध्यम; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.