Nashik News : जिव्हाळ्याचे, धोरणात्मक विषय मार्गी लागावेत! नाशिककरांची रेल्वेमंत्र्याकडून अपेक्षा

Latest Nashik News : नाशिक- पुणे रेल्वे मार्ग, नाशिक रोड ते पालघर हा मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा नवीन रेल्वे मार्ग, मुंबईसाठी लोकल सेवा हे प्रमुख तीन जिव्हाळ्याचे आणि धोरणात्मक विषय मार्गी लागावेत, अशी समस्त नाशिककरांची लोकभावना आहे.
Railway Traction Factory.
Railway Traction Factory.esakal
Updated on

नाशिक रोड : प्रथमच कॅबिनेट रेल्वे मंत्री नाशिकला येत असल्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दौऱ्याबाबत नाशिककरांना आशा आहेत. नाशिक- पुणे रेल्वे मार्ग, नाशिक रोड ते पालघर हा मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा नवीन रेल्वे मार्ग, मुंबईसाठी लोकल सेवा हे प्रमुख तीन जिव्हाळ्याचे आणि धोरणात्मक विषय मार्गी लागावेत, अशी समस्त नाशिककरांची लोकभावना आहे. (Expectations of Nashik people from Railway Ministry)

रेल्वे ट्रॅक्शन मशिन कारखान्याचे विस्तारीकरण, नाशिक पूर्व भागात जनरल तिकीट विक्री केंद्र सुरू करावे. सिंहस्थ कुंभमेळा नियोजनानुसार नाशिक रोड पूर्व भागात फलाट चारशेजारी आरक्षण केंद आहे. या केंद्राच्या एक खिडकीत जनरल तिकीट विक्री केंद्र सुरू केल्यास फायदा होईल. चारही फलाट सुरळीत करावे.

राखेची मालवाहतूक पुन्हा सुरू करावी. देवळालीगाव ते मालधक्का रस्त्याचे रुंदीकरण करावे. फलाट दोन व तीनवर मुंबई बाजूने प्रवासी शेडची लांबी वाढवावी. फलाट दोन, तीन, चारवर मुंबई बाजूने एक पादचारी पूल तयार करावा. भुसावळ- मुंबई- भुसावळ पॅसेंजर सुरू करावी.

दक्षिण भारतासाठी मनमाडऐवजी नाशिक रोड स्थानकावरून गाडी सोडाव्यात. नाशिक रोड स्थानकावर बाहेर राज्यातील दोन मिनिटांऐवजी पाच मिनिटांचा थांबा द्यावा, किसान एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी व ती वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत चालवावी. मालधक्का हा नाशिक रोड येथून हलवू नये, अशी नाशिककरांच्या प्रमुख अपेक्षा आहेत. (latest marathi news)

Railway Traction Factory.
Teerth Darshan Yojana : तीर्थदर्शन योजनेसाठी आले दोन हजार अर्ज; अयोध्या, बुद्धगया, केदारनाथला जाणारे सर्वाधिक

नाशिककडे नेहमीच दुर्लक्ष

मध्य रेल्वेच्या ट्रॅक्शन मोटर आणि रेल्वे इंजिन इलेक्ट्रीक मोटर रिवाईडिंग उत्पादन आणि दुरुस्तीचे काम येथे अत्यंत कुशलतेने होते. २०२४ पासून रेल्वेचे इंजिन व्हील बनवण्याचे काम नव्याने सुरू केले आहे. येथे रेल्वे इंजिन बनविण्याचा कारखाना करावा, अशी मागणी रेल्वे कामगार सेना, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आदींसह विविध संघटनांकडून होत आहे.

एकलहरे रोडवर १९७४ मध्ये इलेक्ट्रिक इंजिन उत्पादन कारखाना मंजूर होता. परंतु १९८० मध्ये सरकार बदलामुळे २५० एकर जमीन संपादित केली. पण २५ एकरावर इलेक्ट्रिक मोटर रिवाईडिंग कारखाना बांधला. दिवंगत रेल्वे मंत्री मधू दंडवते यांचा या जमिनीवर इंजिन लोकोमोटिव्ह इंजिन कारखाना उभारण्याचा मानस होता.

नाशिकमध्ये दहा हजार कर्मचारी काम करून रोजगाराची साधने निर्माण करू शकतात, परंतु राजकारणाच्या गदारोळामुळे नाशिककडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी शंभर एकर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सर्व सुविधा आहेत. इंजिन कारखाना सुरू करण्याची अनेक दिवसांपासून मागणी आहे.

थेट कर्षण काराखान्यापर्यत रेल्वे लाईन टाकण्यासाठी सर्व्हे झाला आहे. आजही सर्व्हे झालेली जागा रिकामी आहेत. रेल्वे लाईन टाकली तर दळणवळणाची सोय होईल. कारखाना तयार झालेले इंजिन बाहेर पडेल. २०१५ मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पियुष गोयल, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, माजी खासदार हेमंत गोडसे, रेल्वे कामगार पाठपुराव्यामुळे येथे चाके कारखान्यास मंजुरी दिली. २०२४ ला कारखाना सुरू झाला आहे. आता विस्तार करण्याची गरज आहे

Railway Traction Factory.
Nashik News: टायटल क्लिअर नसताना घरे फ्री होल्ड कशी? सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी समितीचा सवाल, निवडणूक ‘स्टंट’चा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.