Nashik Manohar Karda Case : मनोहर कारडा यांच्या डायरीतील 65 पानांमधील मजकूरानुसार तपास

Nashik News : कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोहर कारडा यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी भारती कारडा यांनी उपनगर पोलिसांना दिलेल्या अर्जाची सहायक पोलिस आयुक्तांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Manohar Karda
Manohar Kardaesakal
Updated on

Nashik News : कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोहर कारडा यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी भारती कारडा यांनी उपनगर पोलिसांना दिलेल्या अर्जाची सहायक पोलिस आयुक्तांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. संशयितांसंदर्भातील उल्लेख असलेली डायरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. (Nashik investigation based on 65 page diary of Manohar Karda director of Karda Construction)

चौकशीत तथ्य आढळल्यास अर्जातील संशयितांविरोधात मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मनोहर कारडा यांनी गेल्या २ नोव्हेंबर २०२३ रोजी धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली होती. तर, त्यांचे बंधू नरेश कारडा हे फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक होते.

पाच महिन्यांनंतर मनोहर कारडा यांच्या पत्नी भारती कारडा यांनी उपनगर व नाशिक रोड पोलिसांना अर्ज देत त्यातील १९ जणांच्या जाचाला कंटाळून मनोहर कारडा यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या संशयितांविरोधात सावकारी कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी हे भारती कारडा यांच्या अर्जाची चौकशी करीत आहेत. भारती कारडा यांना मनोहर कारडा यांची डायरी सापडली होती. ती डायरी तपासासाठी सहायक आयुक्तांकडे देण्यात आलेली आहे. (latest marathi news)

Manohar Karda
Nashik Traffic Rules Break : ‘BMW’च्या सीरिजमध्ये छेडखानी भोवली; इंग्लिश सीरिजमध्ये केला ‘ई’चा‘जे’

अर्जात यांची नावे

अशोक कटारिया, ग्यान खत्री, सनी सलुजा, उर्विश सतिश कोठारी, राहुल लुणावत, कुलदीपसिंग जोहर, रामचंद्र काकराणी, योगेश बबनराव घोलप, आशुतोष राठोड, गजानन देवकर, प्रकाश बेबू चावला, हरिश लखवाणी, मनोहर खेमाणी, अशोक मूलचंदानी (पुणे), हेमंत त्रिलोकाणी, विलास पाटील, महेंद्र कल्याणकर, मुकेश तलरेजा, किशोर कोटकर.

नरेश कारडा पसार

नरेश कारडा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गेल्या आठवड्यात जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तेव्हापासून कारडा हे पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. कारडा यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याची चर्चा आहे. परंतु त्यासंदर्भात पोलिसांकडे कोणतीही माहिती नाही. तर, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्या अटकपूर्व जामीनावर जिल्हा न्यायालयात येत्या २९ तारखेला सुनावणी होणार आहे.

"भारती कारडा यांनी दिलेल्या अर्जानुसार चौकशी सुरू केली आहे. यात तथ्य आढळल्यास त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल." - मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन.

Manohar Karda
Nashik Crime News : बरॅको हॉटेलवर छापा! हुक्का पार्लर उदध्वस्त; अंमलीविरोधी पथकाची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.