Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून ‘झाडाझडती’! एका विभागप्रमुखांकडून दुसऱ्या विभागाची तपासणी; सोमवारी देणार अहवाल

Latest Nashik News : शुक्रवारी (ता. ११) व सोमवारी (ता. १४) कार्यालयांची झाडाझडती करून सायंकाळपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
nashik collector office
nashik collector officeesakal
Updated on

Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक विभागाची दुसऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दोन दिवस दप्तर तपासणी करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ११) व सोमवारी (ता. १४) कार्यालयांची झाडाझडती करून सायंकाळपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (investigation from today in collector office)

महत्त्वाच्या व निकडीच्या कामांच्या फायली जिल्हा प्रशासनाकडे येतात. त्यावर योग्य तो निर्णय घेऊन त्या निकाली काढण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, सर्वसामान्य व्यक्तींची कामे प्रलंबित राहतात का, याची खातरजमा करण्यासाठी दुसऱ्या शाखाप्रमुखांकडून त्याची दप्तर तपासणी केली जाणार आहे.

यात विभागप्रमुखांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या चुकांवर बोट ठेवण्यापेक्षा जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, यावर भर दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सुमारे १७ विभागांची दोन दिवस झाडाझडती होणार आहे.

त्याचे नियोजन झाले असून, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे विभागाची जबाबदारी निश्‍चित केली आहे. विभागप्रमुखांच्या कामावर विसंबून न राहता दुसऱ्या विभागाकडून त्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (latest marathi news)

nashik collector office
Assembly Election 2024 : तुतारी फुंकण्यास अनेकजण तत्पर...संधी मिळणार कुणाला? पक्षाने सर्वांनाच ठेवले आशेवर

या विभागांची होणार दप्तर तपासणी

आस्थापना, महसूल, टंचाई, कुळ कायदा, गृह, गौणखनिज, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार, पुनर्वसन, ग्रामपंचायत, भूसंपादन, पालिका, अपील शाखा, संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग, जिल्हा निवडणूक शाखा, नागरी जमीन कमाल धारणा कायदा (यूएलसी) या विभागांची दप्तर तपासणी होणार आहे.

"अधिकारी किंवा विभागांच्या चुका शोधण्यासाठी ही मोहीम नाही. काही विभागांमध्ये फायली बऱ्याच दिवस एकाच ठिकाणी पडून राहतात का? सर्वसामान्य व्यक्तींची कामे वेळेत होतात, याविषयी चाचपणी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे."

-बाबासाहेब पारधे, अप्पर जिल्हाधिकारी

nashik collector office
Cabinet Meeting: मंत्रिमंडळाचे 'हे' निर्णय अजित पवारांना पटले नाहीत? सही न करताच दहा मिनिटांतच कॅबिनेट सोडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.