Nashik News : सोयगाव नववसाहतीत घंटागाडीची अनियमितता! डास प्रतिबंधक फवारणी नाही, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Nashik News : अनियमितपणे येणाऱ्या घंटागाडीमुळे सोयगाव परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
Soygaon Thiel Daulatnagar area, garbage thrown by citizens on open land due to non-arrival of bell trains.
Soygaon Thiel Daulatnagar area, garbage thrown by citizens on open land due to non-arrival of bell trains.esakal
Updated on

सोयगाव : अनियमितपणे येणाऱ्या घंटागाडीमुळे सोयगाव परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. घंटागाडी नियमित नसल्याने नागरिक परिसरातील मोकळ्या जागेतच कचऱ्याची विल्हेवाट लावतात. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून येथे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. (Nashik Irregularity of clockwork in Soygaon new colony No anti mosquito spraying health of citizens at risk marathi news)

सोयगवसह विठ्ठल नगर, शिव रस्ता, काशिनाथ बाबा नगर परिसरात घंटागाडी नियमितपणे येत नाही. त्यामुळे जमा झालेला कचरा नागरिक आजूबाजूच्या परिसरात टाकतात. परिसरात असलेल्या मोकळ्या भूखंडांचा वापरही कचराकुंडी म्हणूनच होत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात उग्र स्वरूपाचा वास आणि दुर्गंधी पसरली आहे.

यातच नियमित औषध फवारणी नसल्याने डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे. दुसरीकडे शहरात डेंग्यूसारख्या रोगाची साथ सुरू आहे. यामुळे लहान मुले तेथेच खेळतात, त्यांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. कधी कधी तर पंधरा दिवस उलटूनही घंटागाडी येत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सायंकाळी घरामध्ये थांबणे शक्य होत नाही. उद्यान व मैदानांमध्येही थांबता येत नाही. या समस्येमुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, औषध फवारणीचे प्रमाण वाढविले पाहिजे, सायंकाळीही फवारणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.  (latest marathi news)

Soygaon Thiel Daulatnagar area, garbage thrown by citizens on open land due to non-arrival of bell trains.
Tata -Hindustan petroleum Agreement : टाटा-हिंदुस्‍तान पेट्रोलियमचा करार ; देशभरात ‘ईव्‍ही’ चार्जिंग सुविधेचा विस्तार करणार

वारंवार तक्रारी करूनही प्रशासन व ठेकेदार त्याकडे लक्ष देत नाहीत. अनेक भागात गटारी व कचऱ्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिक वारंवार याविषयी तक्रारी करत असतात. पाठपुरावा करूही प्रशासन लक्ष देत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

"सोयगावसह परिसरात डास, चिलटे व मच्छर यामुळे नागरिक त्रासले आहेत. सायंकाळी डास तर घरात थांबू देत नाहीत. गेल्या वर्षभरापासून सोयगावसह परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी झालेली नाही. घंटागाडी येत नाही सोयगाव परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे."- जयेश आहिरे, मालेगाव

Soygaon Thiel Daulatnagar area, garbage thrown by citizens on open land due to non-arrival of bell trains.
Nashik News : रेशन दुकानदारांना ई पॉस मशीन! वेळ बचतीसह धान्य वितरण प्रक्रियेत येणार सुलभता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.